रोटरीने केली उपेक्षितांची दिवाळी गोड —– निराधार,दिव्यांग व भक्तीप्रेम आश्रमात फराळाचे वाटप
——
अंबाजोगाई -: शहर व परिसरातील निराधार,दिव्यांग,मनोरुग्ण व भक्तीप्रेम आश्रमात दिवाळीच्या फराळाचे वाटप करून रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी ने उपेक्षितांची दिवाळी गोड केली.
गुरुवारी सकाळी मानवलोक जनसहयोग कार्यालय येथे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या कल्पना लोहिया होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध व्यापारी जुगलकिशोर सारडा,प्रसिद्ध हद्यरोग तज्ञ डॉ.नवनाथ घुगे, रोटरीचे प्रांत संचालक प्रवीण चोकडा, प्रा. संतोष मोहिते,प्रा. रोहिणी पाठक, आनंद कर्णावट,डॉ.निशिकांत पाचेगावकर,मोईन शेख,जगदीश जाजू ,रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी, प्रोजेक्ट डायरेक्टर अविनाश मुडेगावकर,को.प्रोजेक्ट डायरेक्टर राम सारडा,मानवलोक जनसहयोग चे शाम सरवदे,संजना आपेट,दिलीप मारवाळ, सचिन गायकवाड यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना कल्पना लोहिया म्हणाल्या की रोटरी क्लब गेल्या ११ वर्षा पासून सातत्याने हा उपक्रम राबवून उपेक्षितांच्या जीवनात गोडवा निर्माण करत आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देता आला पाहिजे.असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ.नवनाथ घुगे, प्रवीण चोकडा, प्रा. रोहिणी पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनराज सोळंकी यांनी केले.संचलन भीमाशंकर शिंदे यांनी तर उपस्थितांचे आभार राम सारडा यांनी मानले. यावेळी प्रवीण मार्कंडेय, भागवत कांबळे, विश्वनाथ लहाने,डॉ.अनिल केंद्रे,अजित देशमुख, प्रा.रमेश सोनवळकर,शिवकुमार निर्मळे, सचिन बेंबडे, प्रा.अजय पाठक,राधेश्याम लोहिया,डॉ,सुरेश अरसुडे, पुरुषोत्तम रांदड,गणेश घाडगे, प्रदीप झरकर यांच्यासह रोटरी क्लब चे सदस्य उपस्थित होते.
