*खा. बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात त्यांची ताकत दाखवली तर त्यांचं पक्षात वजन वाढेल अन्यथा शंकेला वाव राहणार*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
खासदार बजरंग सोनवणे यांची विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिसून येत असलेली भूमिका पाहता त्यांनी बीड जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात आपली ताकत लावली तरच त्यांच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात वजन वाढणार आहे अन्यथा शंकेला कुठेतरी वाव राहणार आहे.
चार महिन्या पूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकी मध्ये बीड जिल्ह्यातील जनतेने जात पात याचा काडीचाही विचार न करता जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तुतारी हाती घेऊन खासदार म्हणून बजरंग बप्पा सोनवणे यांना विजयी केले. बजरंग सोनवणे विजयी झाल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला बळकटी मिळेल असा कयास केला जात होता मात्र नुकत्याच वाहू लागलेल्या विधान सभेच्या निवडणूक वाऱ्याने चित्र पलटताना दिसते आहे.
लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश पाहून बीड जिल्ह्यासह राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तुतारी हाती घेण्यासाठी स्पर्धा लागली. त्यामुळे प्रत्येक मतदार संघात इच्छुक उमेदवारांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढू लागली हे वास्तव कोणीही नाकारनार नाही. या परिस्थिती मधून तोडगा काढून पक्ष बळकट करण्यासाठी ज्या त्या जिल्ह्यातील प्रमुख नेतृत्वाची जवाबदारी असताना व बीड जिल्ह्यात ही जबाबदारी विद्यमान खासदार यांच्यावर अलेली असताना आणि बजरंग सोनवणे यांच्या विजयात सिहांचा वाटा असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर शरदचंद्र पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले बीड विधानसभेचे उमेदवार विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर व केज विधानसभा मतदार संघाचे उमेदवार माजी आ. पृथ्वीराज साठे या दोघांना उमेदवारी मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. केवळ एकनिष्ठेचे फळ म्हणून खा शरदचंद्र पवार साहेबांनी या दोघासह आष्टी-पाटोदा विधानसभा मतदार संघात महेबूब शेख यांना उमेदवारी दिली.
माजलगाव मतदार संघाची उमेदवारी मिळण्या साठी खासदार यांच्या सल्ला मसलतीने राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलेले रमेशराव आडसकर यांच्या उमेदवारीलाही शेवटच्या घटकाला विरोध केल्या मुळे पवार साहेबांना अडसकरांची उमेदवारी बदलून पक्ष प्रवेश न होताच भाजपचे मोहन जगताप यांना उमेदवारी द्यावी लागली. अशीच थोडीफार परस्थिती परळी मतदार संघात झाली. आपल्यालाच उमेदवारी मिळणार या दिव्य स्वप्नात राजाभाऊ फड हे गुडघ्याला बाशिंग बांधून असताना
अखिल भारतीय काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख माकेगावकर यांना पक्षात प्रवेश देण्यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली गेली.
आज खासदार बजरंग बप्पा बीड जिल्ह्यातील सहाही मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा दावा करत असले तरी
केज मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी संगीताताई ठोंबरे यांच्या रॅलीत बप्पाच्या कार्यकर्त्यांचा असलेला सहभाग काहीं लपून राहिला नाही. केज मधून पृथ्वीराज साठे व बीड मधून संदीप क्षीरसागर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी बप्पाची असलेली अनुपस्थिती आणि जिल्ह्यातील अन्य मतदार संघातील उमेदवारांचा अर्ज दाखल करतेवेळी असलेला सहभाग या मुळे बप्पाची भूमिका काही स्पष्ट होताना दिसत असून जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघात खासदार म्हणून बजरंग बप्पाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी आपली ताकत दाखवली तरच सर्व उमेदवारांना बळकटी मिळणार आहे.
आणि त्यांचही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात वजन वाढणार आहे अन्यथा शंकेला कुठेतरी वाव राहणार आहे हे मात्र निश्चित.
