*अंबाजोगाई शहरातील पत्रकारांच्या आरोग्याची काळजी मराठी पत्रकार परिषद करते आहे ही भूषणावह बाब* *सुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ दीपक कटारे यांचे उदगार*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
डॉ राजेश इंगोले यांच्या माध्यमातून अंबाजोगाई शहरातील पत्रकारांच्या आरोग्याची काळजी मराठी पत्रकार परिषद करते आहे ही भूषणावह बाब असुन आरोग्य शिबिराचा अधिकाधिक पत्रकारांनी लाभ घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी असे उदगार सुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ दीपक कटारे यांनी काढले.
मराठी पत्रकार परिषद व आय एम ए सांस्कृतिक समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई शहरातील सर्व पत्रकारा साठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबीर प्रसंगी डॉ दीपक कटारे हे बोलत होते.
या प्रसंगी मेडिसिनचे डॉ संदीप जोगदंड, नेत्र रोग तज्ञ डॉ प्रज्ञा कीनगावकर, त्वचा रोग तज्ञ डॉ जिगिशा मुळे यांच्या सह मराठी वैद्यकीय कक्ष प्रमुख डॉ राजेश इंगोले, हल्ला विरोधी कृती समिती निमंत्रक दत्तात्रय अंबेकर, तालुका अध्यक्ष प्रशांत लाटकर यांची उपस्थिती होती.
या वेळी बोलताना डॉ दीपक कटारे म्हणाले की, अलीकडे हृदय विकाराचे प्रमाण मोठ्या प्रमानावर वाढले आहे. त्यामुळे वयाच्या 40 व्या वर्षा नंतर प्रत्येकाने आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली तरच शरीरात होणाऱ्या बदला विषयी आणि त्या संदर्भात घ्यावयाच्या काळजी विषयी आपल्याला संकेत मिळतात.
डॉ राजेश इंगोले यांच्या माध्यमातून अंबाजोगाई शहरातील पत्रकारांच्या आरोग्याची काळजी मराठी पत्रकार परिषद करते आहे ही भूषणावह बाब असुन आरोग्य शिबिराचा अधिकाधिक पत्रकारांनी लाभ घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी.
या वेळी बोलताना डॉ राजेश इंगोले म्हणाले की पत्रकारांच्या आरोग्य तपासणी साठी डॉ दीपक कटारे हे लातुर हुन अंबाजोगाईला आले. ज्या डॉक्टर मध्ये दात्रत्व आहे अशी मंडळी पत्रकारांच्या आरोग्य तपासणी साठी या ठिकाणी आली असून रक्त तपासणी मध्ये आढळून आलेल्या दोषा वर प्रतिबंधात्मक उपाय तज्ञ डॉक्टर मंडळी सांगणार आहे.
या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दत्तात्रय अंबेकर यांनी शहरातील सर्व पत्रकारासाठी हे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. ज्यांना आपल्या आरोग्याची काळजी आहे अशा पत्रकारांनी शिबिराचे आयोजन कोण केले आहे याचा विचार न करता आरोग्य शिबिरात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरेंद्र गुप्ता यांनी केले. या प्रसंगी प्रकाश लखेरा, संतोष बोबडे, एम एम कुलकर्णी, गोविंद खरटमोल, पुनमचंद परदेशी, व्यंकटेश जोशी, अशोक दळवे, गोविंद जाधव, परमेश्वर गित्ते, शेख मुशीर बाबा, शेख फिरोज, नागनाथ वारद, पुराणिक सर आदींची उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल अंबाड, सचिन साळवे, समता इंगोले, तुषार मनोहर, अर्जुन शिंदे, मनोज इंगोले, अक्षय इंगोले, मयूर गायकवाड, गोविंद गायकवाड, गौतम घनघाव, शेख बाबा, अजित आव्हाड, अजय रापतवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
