_भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, एसआयपी व इतर मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केला अर्ज दाखल_*
*मागील पाच वर्षांत सातत्यपूर्ण जनसंपर्क ठेवून प्रामाणिकपणे विकासकामे केली – आ. नमिता अक्षय मुंदडा*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, एसआयपी व इतर मित्र पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी सोमवार, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी केज तहसील कार्यालयात सहकाऱ्यांसह जाऊन अत्यंत साध्या पद्धतीने आपला २३२ केज विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रारंभी केज विधानसभा मतदारसंघासाठी भाजप – महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सोमवारी सकाळी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या गोपीनाथ गड (परळी वैजनाथ) या स्मृतीस्थळी नतमस्तक होत अभिवादन केले. तसेच उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी केज विधानसभा मतदारसंघाच्या भाग्यविधात्या स्वर्गीय डॉ.विमलताई मुंदडा यांच्या चनई (अंबाजोगाई) येथील स्मृतिस्थळी नतमस्तक होत अभिवादन केले. केज तहसील कार्यालयात सहकाऱ्यांसह जाऊन अत्यंत साध्या पद्धतीने आपला २३२ केज विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्यासोबत ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा, भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण आदींसह महायुतीतील घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी सांगितले की, आशीर्वाद जनतेचा, आणि वसा केज विधानसभेच्या प्रगतीचा घेऊन आम्ही काम करीत आहोत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय (ए), एसआरपी व इतर मित्र पक्ष महायुतीच्या २३२ केज विधानसभेच्या अधिकृत उमेदवार म्हणून मी नमिता मुंदडा आज रोजी केज विधानसभेतील जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा निवडणूक लढविण्यासाठी साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केजच्या जनतेने २०१९ मध्ये मला सर्वप्रथम आमदार केले मिळालेल्या संधीचे मी विकास कामे करून सोने करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मागील पाच वर्षांत आम्ही जनतेसाठी पूर्ण वेळ उपलब्ध राहिलो. या काळात आम्ही जनतेची सेवा केली. पाच वर्षे संपली आहेत. आम्ही परीक्षेसाठी पुन्हा नव्याने सज्ज झालो आहोत. आम्हाला विश्वास आहे. की, जनता आम्हाला या परीक्षेत ही पुन्हा उत्तीर्ण करेल. जनता आम्हाला परत एकदा पाच वर्षांसाठी निवडून देईल. सगळ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. जनता आम्ही केलेल्या विकासकामांना समोर ठेवून नक्कीच आम्हाला मतदान करतील. आम्ही आरपीआय सह सर्वांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. विकास हाच आमचा मुख्य मुद्दा आहे. आम्ही पाच वर्षांत सातत्यपूर्ण जनसंपर्क ठेवला आहे. मूलभूत सुविधा पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या पाच वर्षांत जे करता आले नाही. ते पुढील पाच वर्षांत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास माजी आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी व्यक्त केला. यावेळी महायुतीच्या सर्व पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
