अंबाजोगाई

बजरंग बप्पा सोनवणे कुठं गायब आहेत ? पक्ष देत असलेले उमेदवार त्यांना मान्य नाहीत की काय? 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
    विधानसभा निवडणूकी साठी उमेदवारी दाखल करण्यास अवघे 3 दिवस बाकी असतानाही लोकसभा निवडणुकीत लॉटरी लागलेले बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे मात्र गायब दिसत असुन विधानसभा निवडणुकी मध्ये पक्षाने दिलेले उमेदवार त्यांना मान्य नाहीत की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
        देशभरात नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळाले व याला कारण ठरले ते म्हणजे राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार यांच्या सोबत केलेली व सामान्य जनतेला न पटलेली अभद्र युती आणि यातून निर्माण झालेली खा शरदचंद्र पवार व उद्धव ठाकरे यांच्या विषयीची सहानभूतीची लाट. या लाटे मध्ये राज्यात शरदचंद्र पवार यांच्या तुतारीने 10 पैकी 8 जागा जिंकल्याने अनेक नवख्या उमेदवारांच्या लॉटऱ्या लागल्या त्या पैकी एक आहेत बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे. लोकसभा होतात न होतात तोच राज्यात असा करिश्मा झाला की भाजप सह अन्य पक्षातील बड्या बडया नेत्यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची तुतारी हाती घेण्यास सुरुवात केली त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सर्वाधिक इनकमिंग कोणाकडे होते आहे तर ती शरदचंद्र पवार यांच्याकडे हे उभा महाराष्ट्र आणि देश पाहतो आहे.
    राज्यात आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी उमेदवारामध्ये स्पर्धा लागली आहे. बीड जिल्ह्यातही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 6 विधानसभा पैकी जवळपास 5 विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे उमेदवार येत आसून आता पर्यंत पक्षाने केवळ केज मधून माजी आ पृथ्वीराज साठे तर आष्टी मधून महेबूब शेख या निष्ठावंताना उमेदवारी जाहीर केली असून लोकसभा निवडणुकीत जीवाचे रान करणारे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना मात्र पक्षाच्या पहिल्या यादीत डावलल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून जातीय समीकरण आणि क्षीरसागर कुटुंबातील अंतर्गत वाद या मुळे बीडच्या उमेदवारीचा तिढा सुटला नसल्याचे बोलल्या जाते आसून माजलगाव मतदार संघात कालच रमेशराव आडसकर यांनी तुतारी हाती घेतल्याने जवळपास त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीत महत्वाची भूमिका बजावणारे धनंजय मुंडे यांना घेरण्या साठी बीड जिल्ह्यातील परळी मतदार संघातून धनंजय मुंडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली शरदचंद्र पवार गटात सुरु असून साम दाम दंडा सह सर्व ताकती निशी निवडणूक मैदानात उतरू शकणारे गंगाखेडचे माजी आमदार रत्नकार गुट्टे यांचे चिरंजीव सुनील गुट्टे यांना उमेदवारी देण्यासाठी पक्ष विचाराधीन असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
     विधानसभा निवडणूकी साठी उमेदवारी दाखल करण्यास आता अवघे 3 दिवस बाकी असून लोकसभा निवडणुकीत लॉटरी लागलेले बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे मात्र या प्रक्रिये पासून गायब दिसत आहेत. प्राप्त माहिती नुसार केज मतदार संघात
शरदचंद्र पवार साहेबांनी पहिल्याच यादीत उमेदवारी दिली असे पृथ्वीराज साठे यांच्या उमेदवारीला बप्पाचा विरोध होता त्यांनी अंजली घाडगे यांना उमेदवारी मिळवन्यासाठी आपली ताकत लावली होती वास्तविक लोकसभा निवडणुकी मध्ये केज मतदार संघातून शरदचंद्र पवार गटात एकनिष्ठ राहिलेले व बप्पाचे प्रामाणिकपणे काम केलेले पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी मिळाल्यावर बप्पाला आनंद व्हायला हवा होता मात्र त्यांनी अंजली घाडगे यांना उमेदवारी मिळवन्यासाठी लावलेली ताकत काही लपून राहिलेली नाही. अन्य सर्व मतदार संघातील उमेदवारांचे तर आज उद्या चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे पृथ्वीराज साठे सह पक्षा कडुन जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात
येत असलेले उमेदवार बजरंग बप्पा यांना मान्य नाहीत की काय? त्यामुळे ते विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये अलिप्त तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!