अंबाजोगाई

MPDA कायद्याअंतर्गत अंबाजोगाई शहरातील गौरव कुचेकर या गुंडाची हर्सल कारागृहात रवानगी

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबाध्दीत ठेवण्यासाठी पोलीस अधिक्षक श्री अविनाश बारगळ यांच्या आदेशानुसार
अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पो नि विनोद घोळवे यांनी गौरव राजाभाऊ कुचेकर वय ३२ वर्षे रा. वडरवाडा अंबाजोगाई याचे विरुद्ध MPDA कायद्या अंतर्गत कार्यवाही करून त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे.
    बीड जिल्हयातील सर्वाजनिक सुव्यवस्था व कायदा आणि सुव्यवस्था अबाध्दीत ठेवण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री अविनाश बारगळ यांनी जिल्हयाची धुरा संभाळल्यापासुन शर्तीचे प्रयत्न चालविले आहेत. बीड जिल्हयातील गुंडगीरीचे व गुन्हेगारीचे समूळ उच्चटन करण्याच्या उदात्त दृष्टीकोण डोळयासमोर ठेवुन MPDA कायद्याअंतर्गत बऱ्याच गुन्हेगारावर व गुंडावर कार्यवाही करण्याचे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर योजीले आहे. त्याअनुषंगाने पोनि श्री विनोद घोळवे पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर यांनी दिनांक २६/०९/२०२४ रोजी इसम नामे गौरव राजाभाऊ कुचेकर वय ३२ वर्षे रा. वडरवाडा अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड यांचे विरुध्द MPDA कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक बीड यांचे मार्फतीने मा, जिल्हादंडाधिकारी साहेच बीड यांना सादर केला होता.
    सदर स्थानबध्द इसमाविरुध्द पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे दहशत पसरविणे, रस्ता अडविणे, मारहान करणे, खंडणी मागणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, अशा स्वरुपाचे एकुण ६ गुन्हयाची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्यापैकी, ४ गुन्हे न्याय प्रविष्ठ असुन दोन गुन्हे पोलीस तपासावर आहेत. तसेच नमुद इसमावर त्यांने आपली वर्तवणुक सुधारावी म्हणून यापुर्वी सी आर पी सी कलम ११० प्रमाणे दिनांक २९/१२/२०२२ रोजी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती. परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कार्यवाहीस न जुमानता पुन्हा चढत्या क्रमाने गुन्हे करण्याची श्रृखंला चालुच ठेवून होता. त्याची अंबाजोगाई शहरात व परीसरात प्रचंड दहशत आहे. त्यांचे विरुध्द लोक फिर्याद देण्यास अथवा साक्ष देण्यास लोक समोर येत नाहीत. तो सर्व सामान्य लोकांना त्रास देऊन दहशत निर्माण करून व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहचत होता.
   सदर प्ररणात श्री अविनाश पाठक जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक २४/१०/२०२४ रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने MPDA कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवुन
हर्सल कारगृह छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध्द करणे बाबत आदेश पारीत केले आहेत. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवुन कार्यवाही करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखा बीड व पोलीस निरीक्षक अंबाजोगाई शहर यांना दिल्या होत्या. त्यानंतर पोह/५६८ ठोंबरे, पोह/३०६ जायभाये, पोह/९८९ सानप, पोना/२०२९ सानप, स्थागुशा बीड, पोअं/२०२० नागरगोजे पोस्टे अबाजोगाई शहर या टीमनी सदर प्रस्तावित स्थानबध्द इसमास दिनांक २४/१०/२०२४ रोजी १६.४० वाजता ताब्यात घेवुन पोस्टे अंबाजोगाई शहर येथे हजर केले. त्यानंतर पोनि अंबाजोगाई शहर यांनी दिनांक २४/१०/२०२४ रोजी सदर इसमास कायदेशीर रित्या ताब्यात घेवुन योग्य पोलीस बंदोबस्तात हर्सल कारगृह छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध करणे कामी रवाना केले आहे.
   सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक श्री अविनाश बारगळ, श्रीमती चेतना तिडके अप्पर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई, श्री अनिल चोरमले उपविभागीय पोलीस अधिकारी उप विभाग अंबाजोगाई, श्री उस्मान शेख, पोलीस निरीक्षक स्थागुशा बीड यांच्या मार्गदर्शाना खाली पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, पोह/१४८५ वडकर, सहा, पोलीस उप निरीक्षक अभिमान्यु औताडे स्थागुशा बीड यांनी केली आहे. भविष्यात वाळूचा चोरटा व्यापार करणारे तसेच जिवन आवश्यक वस्तुचा काळा बाजार करणारे व्यक्ती व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहादर, धोकादायक गुंडावर जास्तीत जास्त MPDA कायद्याअंतर्गत आगामी विधानसभा निवडणुक संमधाने कठोर कार्यवाही करण्याचे संकेत पोलीस अधिक्षक श्री अविनाश बारगळ यांनी दिलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!