*पृथ्वीराज साठे यांच्या समोर आ नमिता मुंदडा यांचे तगडे आव्हान शरदचंद्र पवार साहेबांनी आ पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देऊन दिले निष्ठेचे फळ*
अंबाजोगाई (प्रतिनिधी )
केज विधानसभा मतदार संघा मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा कडुन निवडणूक लढवण्यास आमदारकीच्या स्वप्नात रंगलेले जवळपास 12 जण हातात तुतारी घेण्यास इच्छुक असतानाही अखेर शरदचंद्र पवार साहेबांनी माजी आ पृथ्वीराज साठे यांनाच उमेदवारी देऊन निष्ठेचे फळ दिल्याने कार्यकर्त्या मध्ये उत्साह निर्माण झाला असुन उमेदवारीचे वृत्त शहरात येऊन धडकताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान माजी आ पृथ्वीराज साठे यांच्या समोर विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांचे तगडे आव्हान असून साठे हे आव्हान कितपत पेलतात आणि त्यांच्या साठी कार्यकर्ते कितपत जिवाच रान करतात हे येणारा काळच ठरवणार आहे.
मागील अडीच वर्षात महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पडलेले 2 गट यातून उदयाला आलेले किळसवाणे राजकारण आणि यातून राहुल गांधी, शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे या महाविकास आघाडीच्या नेत्याला मिळालेली सहानभूती व यामुळेच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश संपूर्ण देशाने पाहिले.
याचाच दुसरा अंक विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आता राज्य आणि देश पाहनार असुन विधानसभेच्या तोंडावर महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे राज्य भरातील सर्वच मतदार संघा मधून उमेदवारी मागण्यांसाठी इच्छुकांची इनकमिंग मोठ्या प्रमानावर सुरू आहे.
राज्य भरातील इतर मतदार संघा प्रमाणे केज मतदार संघाची परिस्थिती असून या दोन्ही मतदार संघातुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र या मतदार संघात उमेदवारी देते वेळी
शरद पवार साहेबांना पक्ष फुटीच्या वेळी बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर व केज मतदार संघातून माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी जी खंबीर पणे पाठीशी उभा राहून साथ दिली आणि लोकसभा निवडणुकीत या दोघांनी खा बजरंग बप्पा सोनवणे यांना मताधिक्य मिळवून देण्यात जे अहोरात्र परिश्रम घेतले त्या पक्ष निष्ठेचे फळ म्हणून शरद पवार साहेबांनी विधान सभा निवडणुकीत उमेदवारी देतांना चलत्या घोड्यावर डाव लावनाराला उमेदवारी देऊन फसगत करून घेण्यापेक्षा बीड मधून संदीप क्षीरसागर आणि केज मधून पृथ्वीराज साठे यांनाच उमेदवारी द्यायला हवी अशी प्रतिक्रिया मतदारा मधून व्यक्त होत होती.
महाविकास आघाडीच्या युतींमध्ये केज मतदार संघ हा राखीव असल्याने आखील भारतीय कोंग्रेसला सोडावी या साठी मतदार संघातील त्या पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते. शरदचंद्र पवार गटाची तुतारी हातात घेण्यासाठी माजी आ पृथ्वीराज साठे यांच्या सह माजी आ संगीता ठोंबरे, अंजली घाडगे, एन डी शिंदे असे एकूण 12 जण इच्छुक होते. मात्र मतदार संघातील जनतेचीच ईच्छा होती की शरदचंद्र पवार साहेबानी पृथ्वीराज साठे यांना केज मतदार संघाची उमेदवारी द्यायला हवी आणि अखेर मतदार संघातील जनतेची ही ईच्छा पवार साहेबांनी पूर्ण केली असुन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शिष्टाई मुळे पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देऊन संकटकाळी केलेल्या सहकार्याची एक प्रकारे परतफेड केली आहे असेच म्हणावे लागेल.
माजी आ पृथ्वीराज साठे यांच्या समोर विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांचे तगडे आव्हान असून आ मुंदडा यांच्या कडे नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा यांच्या माध्यमातून साम दाम, दंड ही मोठी ताकत असल्याने हे या आव्हान पेलण्यात ते कितपत यशस्वी होतात, केजच्या निवडणूक रिंगणात आणखी कोण मातब्बर येतो का ? त्याचा फायदा तोटा कोणाला होतो या बाबी येणाऱ्या काळातच समोर येणार आहे. असं म्हंटल तर वावग ठरणार नाही.
