अंबाजोगाई

*बीड जिल्हा शिवसेना प्रमुख सचिन मुळूक यांच्या विरुद्ध अंबाजोगाई तालुका शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांची दंड थोपटले*

*****************************
अंबाजोगाई / प्रतिनिधी
      अंबाजोगाई तालुका शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांची बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या विरुद्ध दंड थोपटले असुन मुळूक यांचे नाव न घेता टीका करत ज्या शिवसैनिकाला मतदारसंघातील प्रश्न, समस्या माहीत आहेत व जो मतदारसंघातील आहे अशाच नेत्याला केज विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख गजानन मुडेगावकर, शहरप्रमुख ऋषिकेश लोमटे व दादासाहेब देशमुख यांनी केली. ते अंबाजोगाईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
     शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, प्रशांतनगर येथे शिवसेना (शिंदे गट) यांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना शहरप्रमुख ऋषिकेश आण्णासाहेब लोमटे यांनी सांगितले की, विधानसभेवर भगवा पुन्हा एकदा फडकावयाचा आहे. शिवसेना संघटनात्मकदृष्ट्या वाढली पाहिजे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिवसेनाप्रमुख एकनाथराव शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे केज मतदारसंघात शिवसेना संपविण्यासाठी, शिवसेना फोडण्यासाठी जे लोक काम करीत आहेत. अशा लोकांना प्रत्येक निवडणुकीत आम्ही कसे व का सहकार्य करावे असा टोला सचिन मुळूक यांच्यावर नांव न घेता त्यांनी लगावला.
   ज्या शिवसैनिकाला मतदारसंघातील प्रश्न, समस्या माहीत आहे. व जो मतदारसंघातील आहे अशाच नेत्याला केज विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात यावी आम्ही समन्वयक म्हणून दादासाहेब देशमुख यांचे नांव सुचवित आहोत, अंबाजोगाई शहर व तालुक्यात शिवसेनेचे पाच हजारांहून अधिक सक्रिय सभासद आहेत. मराठी माणूस मोठा झाला पाहिजे, शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणूक लढवायची आहे. शिवसेनेकडे वैजनाथ वाघमारे, रामहरी राऊत व लहू बनसोडे हे इच्छुक उमेदवार आहेत. महायुती म्हणून आम्ही काम करणार‌ आहोत. पण,  शिवसेना संपविण्याचे षडयंत्र कोणी करू नये. अन्यथा आम्हाला आमची ताकद दाखवून द्यावी लागेल असा इशारा शहरप्रमुख ऋषिकेश लोमटे यांनी दिला. तर यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख गजानन मुडेगावकर म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे साहेबांसाठी आम्ही महायुतीचे काम करू, पाच वर्षे शिवसेनेची माणसे फोडणे, केज मतदारसंघात शिवसेना वाढू द्यायची नाही. तसेच घटक पक्ष संपविण्याचे धोरण भाजपाने अवलंबिले आहे. हे कसे विसरायचे. त्यामुळे आम्हाला भाजपाने ग्रहित धरू नये असे उपजिल्हाप्रमुख मुडेगावकर यांनी सांगितले.
    शिवसेनेकडून विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या लहू बनसोडे यांनी मागील ३० वर्षांपासून केज राखीव मतदारसंघात फक्त एकाच कुटुंबाची सत्ता कायम आहे. त्यामुळे मतदारसंघात विकासाचे प्रश्न, समस्या सुटू शकले नाहीत. कोणत्या ही तरूणाला रोजगार उपलब्ध झाला नाही. त्यामुळे मतदारांनी शिवसेनेला एकदा आशिर्वाद व संधी द्यावी आम्ही संधीचे सोने करू, जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करू असे आवाहन बनसोडे यांनी केले. तर ज्येष्ठ शिवसैनिक दादासाहेब देशमुख यांनी सांगितले की, केज मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक ताकद मोठी आहे. तरी ही निवडणूकीत आम्हाला डावलले जात आहे. आम्ही दरवेळी भाजपाला मदत केली, सत्ता मिळवून दिली तरीही भाजपाने कायमच केज मतदारसंघातील शिवसेना संपविण्याचेच काम केले आहे.
मतदार संघात वीज पुरवठा सुरळीत नाही, महिनोन्महिने डिपी मिळत नाहीत. अतिवृष्टीचे पंचनामे नाहीत, शेतकऱ्यांना कसली ही मदत नाही
यावर पक्ष नेतृत्वाने गांभीर्याने विचार केला नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा दादासाहेब देशमुख यांनी दिला. पत्रकार परिषदेत उपस्थितांचे आभार दत्ता नाना देवकर यांनी मानले.
    या पत्रकार परिषदेला शिवसेना बीड जिल्हा सहसंघटक-दत्ता आबा बोडखे,
शिवसेना अंबाजोगाई माजी तालुकाप्रमुख-रमेश टेकाळे,
शिवसेना अंबाजोगाई उपतालुका प्रमुख-दादासाहेब देशमुख,
शिवसेना अंबाजोगाई उपतालुका प्रमुख- विजय जाधव,
शिवसेना अंबाजोगाई उपतालुका प्रमुख-दशरथ चाटे,
शिवसेना अंबाजोगाई उपतालुका प्रमुख-अवधूत कदम,
शिवसेना अंबाजोगाई उपतालुका प्रमुख-खंडू पालकर,
शिवसेना अंबाजोगाई उपशहरप्रमुख-दत्ता नाना देवकर,
युवासेना अंबाजोगाई तालुका प्रमुख- समाधान पिसाळ…
इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
****************************
*****************************

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!