अंबाजोगाई

*भा ज प 99 उमेदवारांच्या पहिल्या यादीत सौ नमिता अक्षय मुंदडा यांचा समावेश, कार्यकर्त्यात उत्साह  विजया साठी कंबर कसण्याचा कार्यकर्त्यांनी केला निर्धार*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
      भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या 99 उमेदवारांच्या पहिल्या यादी मध्ये केज विधान सभा मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ नमिता अक्षय मुंदडा यांचा समावेश असल्याने कार्यकर्त्या मध्ये उत्साह संचारला असून पुन्हा एकदा सौ नमिता मुंदडा यांच्या विजया साठी कंबर कसण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.
   केज विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखिव आसून मागील 5 वर्षा पासून कै विमलताई मुंदडा यांच्या सुनबाई आ. नमिता अक्षय मुंदडा या
केज विधानसभेचे प्रतिनिधीत्व करत आहेत.
   आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने त्यांनी केज विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी आणला. केज विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात आजपर्यंत झालेल्या लोकप्रतिनिधी पैकी पाच वर्षांत सर्वात जास्त निधी आणणाऱ्या आमदार म्हणून त्यांची नोंद झाली आसून भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांची त्यांना असलेली खंबीर साथ, त्यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी हे मागील 30 वर्षा पासून ग्राउंड लेव्हलचे सर्व काम स्वतःच पाहत असल्याने व नंदकिशोर मुंदडा, सौ नमिता मुंदडा व अक्षय मुंदडा हे तिघेही नियोजन बद्ध रित्या मतदार संघातील नागरिकांच्या सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होत असल्याने त्यांच्या दृष्टीने ही एक जमेची बाजू असली तरी मागील अडीच वर्षात राज्यातील बदललेल्या राजकारणा मुळे व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर कोणत्याही आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकी मध्ये पुनश्च आपल्याला उमेदवारी मिळेल याची खात्री वाटत नव्हती मात्र राज्यातील बोटावर मोजण्या एवढेच आमदार असे होते की त्यांना केवळ उमेदवारीच नव्हे तर त्यांना विजयाची खात्री देखील आहे त्या पैकी एक आहेत सौ नमिता मुंदडा.
    २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्षाचे महासचीव यांच्या वतीने आज जाहीर करण्यात आलेल्या 99 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या यादीत केज विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ. नमिता मुंदडा यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून
सौ नमिता मुंदडा यांचा पहिल्याच यादीत समावेश करण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांत आनंदोत्सव साजरा करत असून सौ नमिता मुंदडा यांच्या विजया साठी सर्वांनी कंबर कसण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!