*अंबाजोगाई मध्ये साथीच्या आजार वाढु लागले, स्वा रा ती सह खाजगी रुग्णालयातील रुग्ण संख्येत वाढ*
अंबाजोगाई ( प्रतिनिधी )
वातावरणातील बदलामुळे लहान मुलांची, वृद्धांची प्रकृती वरचेवर बिघडत असून त्यांना सर्दी,ताप, खोकला अशा प्रकारच्या आजारात वाढ होत असल्याने स्वा रा ति रुग्णालयासह खाजगी रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
शहराच्या विविध भागातील लहान मुले, वृद्ध माणसे यांना विविध आजाराची लागण होत असून त्यांच्या रक्ताची चाचणी केली असता त्यांना व्हायरल फिवर आजार सांगितल्या जात आहे वृद्धा सह तरुण मुले लहान बालके यांचाही मोठ्या समावेश प्रमाणात समावेश आहे. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात थंडीताप, पेशी कमी होणे व तत्सम आजाराचे रुग्ण वाढल्याचे दिसत आहेत सध्याची स्थिती लक्षात घेता अधून-मधून पडणारा पाऊस, वातावरणातील बदल, पावसामुळे येणारे दूषित पाणी, परिसरातील अस्वच्छता या सर्व बाबींचा परिणाम या आजारात आहेअसे जरी असले तरी सर्दी, ताप,खोकला,मलेरिया व श्वसन विकारासह इतर आजारांची चाचणी होत आहे सध्या या जीवघेण्या आजाराचे मोठ्या प्रमाणावर थैमान आहे.
सर्वच वयोगटातील नागरिकांना आजाराने घेरले आहे अनेकांना आजाराबाबत गंभीरता वाटत असल्याने ते तात्काळ उपचार घेत आहेत. विविध भागातील घाणीच्या साम्राज्यामुळे डेंग्यु व इतर आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे विशेष म्हणजे शहराच्या जुन्या भागात रिपरिप पावसामुळे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे यातून अनेक प्रकारच्या डासांची निर्मिती होत असून त्यामुळेच साथीच्या आजारांची लागण वाढली आहे अनेक रुग्ण उपचारार्थ दाखल होत आहेत.
शिवाय बसस्थानक,मंदिरे आणि गर्दीची ठिकाणे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असते त्यामुळे तिथेही आजाराची लागण होत आसून स्वा रा ती रुग्णालया सह शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
