*महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, 20 नोव्हेंबर रोजी होणार मतदान आज पासून आचारसंहिता*
नवी दिल्ली(प्रतिनिधी)
अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदे मध्ये महाराष्ट्र व झारखंड विधान सभेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आसल्याने सम्पूर्ण राज्यात आज पासून आचारसंहिता लागू होणार आहे
मागील अनेक महिन्या पासून संपूर्ण देशाचे, पंतप्रधान महोदयासह राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र राज्य विधानभेच्या निवडणूक तारखा जाहीर झाल्याने आता राज्यातील महायुती व महाविकास आघाडी यातील सर्व घटक पक्ष आता आचारसंहितेच्या कक्षेत राहून अधिकृत निवडणूक प्रचार करू शकतील.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केल्या प्रमाणे 9 कोटी 63 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून विदर्भातील 62, खानदेश 47, कोकण ठाणे 39, मुबंई 36, पश्चिम महाराष्ट्र 58 सह मराठवाडयातील 46 आशा एकूण राज्यातील 288 विधान सभा मतदार संघातील लोकप्रतिनिधीची निवड करण्यासाठी इच्छुक उमेदवारासाठी 22 ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिसूचना जाहीर होऊन 23 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल, 30 ऑक्टोबर पर्यंत अर्जाची छाननी होईल. 4 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल.
23 नोव्हेंबर रोजी ज्या त्या मतदार संघ स्थळी मतमोजणी होईल व नवीन विधानसभा आस्तित्वा मध्ये येणार असून सम्पूर्ण राज्यात आज पासून आचारसंहिता लागू होणार आहे. या वेळी राजीव कुमार यांनी नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा व जम्मू काश्मीर येथील निवडणूका शांततेत पाडल्या मुळे मतदारांचे व यंत्रणेचे आभार मानले.
