*चंदन कुलकर्णी यांचे सह लता बर्डे यांचे वेगवेगळ्या अपघातात दुःखद निधन, अंबाजोगाई शहरात सर्वत्र हळहळ*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई येथील माजी गटशिक्षण अधीकारी व सध्या नेकनूर डायट ला कार्यरत असलेले चंदन कुलकर्णी यांचे भिगवन नजीक तर सेवा निवृत्त वन विभागा मधील कर्मचारी दत्तात्रय बर्डे
यांच्या सुविद्य पत्नी लता बर्डे यांचे अंबाजोगाई शहरातील संत भगवान बाबा चौका नजीक अपघाती निधन झाल्याची दुर्देवी घटना आज घडली.
या विषयी प्राप्त माहिती अशी की,
अंबाजोगाई येथील माजी गटशिक्षण अधीकारी व सध्या नेकनूर डायट ला कार्यरत असलेले चंदन कुलकर्णी यांनी काल रात्री विजया दशमी निमित्य अंबाजोगाई शहरात श्री योगेश्वरी देवीच्या मिरवणुकी मध्ये सामील होऊन
सीमोल्लंघन केले व आज गोवा येथील सेमिनॉर कार्यक्रमास उपस्थित राहण्या साठी पहाटे 4 वाजताच सेल्फ ड्रायव्हिंग करत कार ने पुण्याच्या दिशेने निघाले. भिगवन नजीक कार आल्या नंतर अंदाजे साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांची कार रस्ता दुभाजकास धडकली आणि चंदन कुलकर्णी हे जागीच ठार झाले.
या घटनेने अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त होत असतानाच शहरातील सेवा निवृत्त वन विभागा मधील कर्मचारी दत्तात्रय बर्डे हे काल दुपारी त्यांच्या सुविद्य पत्नी लता बर्डे यांचेसह एका मित्राच्या कार मध्ये परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी गेले. सायंकाळच्या सुमारास दर्शन करून परत आल्या नंतर त्यांच्या मित्राने बर्डे पतीपत्नीस त्यांच्या परळी रोड वरील विवेकानंद नगर मधील घरी जाण्यासाठी संत भगवान बाबा चौका नजीक असलेल्या ऊर्जा हॉटेल समोर सोडले व कार पूढे निघून गेली. बर्डे पती पत्नी रस्ता क्रॉस करून घरा कडे जात असतानाच परळी कडे निघालेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या पत्नीस जोराची धडक दिल्याने पत्नी सौ लता ही जागीच ठार झाली व दत्तात्रय बर्डे हे बालंबाल बचावले. या दोन्ही घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
