*आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बँकेकडून ग्राहकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे : संस्थापक राजकिशोर मोदी* *अंबाजोगाई पिपल्स बँकेत कॅश भरणे व काढणे (CDM) मशीनचा शानदार शुभारंभ*
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेत शुक्रवार दि 4 रोजी कॅश भरणे व कॅश काढणे या मशीनचा शानदार शुभारंभ करण्यात आला. यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बँकेच्या ग्राहकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मत अंबाजोगाई पिपल्स बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले. या मशीनचा बँकेचे जेष्ठ संचालक प्रा वसंत चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी, संचालक प्रा वसंत चव्हाण, ऍड विष्णुपंत सोळंके, पुरुषोत्तम चोकडा, अरुण काळे, सुधाकर विडेकर, ऍड सुधाकर कऱ्हाड, शेख दगडू दावल, सुरेश मोदी, प्रकाश लखेरा हर्षवर्धन वडमारे, स्नेहा हिवरेकर,महादेव आदमाणे, सुनील वाघळकर यांच्यासह मनोज लखेरा, किशोर परदेशी, बबन पाणकोळी, सुभाष पाणकोळी, यांच्यासह बँकेचे अनेक सभासद व ग्राहक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ऍड विष्णुपंत सोळंके यांनी केले. त्यांनी राजकिशोर मोदी यांच्या माध्यमातून प्रगतीपथावर असलेल्या अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेने कॅश भरणे व कॅश काढणे (CDM) मशीनच्या रूपाने एक अनोखी भेट दिल्याचे सांगितले. या मशिनद्वारे १००, २००, व ५०० रुपयांच्या नोटा आपल्या खात्यात जमा करता येणार आहेत. या मशीनमध्ये ओरिजिनल व डुप्लिकेट नोटांची पारख देखील होणार असल्याने ही मशीन ग्राहकांच्या साठी अत्यंत उपयुक्त अशी ठरणारी असल्याचे ऍड सोळंकी यांनी सांगितले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी या मशीनचा फायदा बँकेच्या ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन केले.
आपले मनोगत व्यक्त करतांना बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आजपर्यंत आपली बँक म्हणून बँकेस केलेल्या सर्व ग्राहक व ठेवीदारांचे आभार व अभिनंदन केले. बँकेने आपला कारभार या संपूर्णपणे पारदर्शी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. बँकेच्या संपूर्ण शाखा या पूर्णपणे कॉम्प्युटराईज्ड असून वेळोवेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर बँकेच्या दैनंदिन व्यवहारात केला जात असून याचा थेट फायदा हा बँकेच्या ग्राहकांना होत असल्याचे मोदी यांनी अभिमानाने स्पष्ट केले. अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक ही दोन वेळा म्हणजेच संध्याकाळी देखील ग्राहकांना सेवा देत आहे. नुकताच आपल्या बँकेस पुणे जिल्हा सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने शुन्य टक्के एनपीए हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असल्याचे सांगत हे केवळ बँकेच्या ग्राहक, सभासद यांच्या सहकार्यामुळेच शक्य झाल्याचे राजकिशोर मोदी यांनी सांगितले. यापुढेही बँकेच्या वतीने जलद व गतिमान सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन बँकेचे अध्यक्ष या नात्याने राजकिशोर मोदी यांच्या वतीने उपस्थित सर्व ग्राहकांना देण्यात आले.
आजच्या काळात बँकेच्या ग्राहकांची गरज व निकड लक्षात घेऊन कॅश भरणे व कॅश काढणे CDM या मशीनची उपलब्धता करण्यात आल्याचे सांगून या मशीनचा बँकेच्या ग्राहकांनी फायदा घेऊन आपला रांगेत उभा राहण्यापासूनचा वेळ वाचनार आहे. ही मशीन सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार असून या मशीनचा फायदा शहर व परिसरातील सर्व ग्राहकांनी घेण्याचे आवाहन संस्थापक राजकिशोर मोदी यांनी केले.
या CDM मशीनच्या शुभारंभ प्रसंगी बँकेचे ग्राहक, ठेवीदार, सभासद व संचालक मंडळ मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कचरूलाल सारडा, धम्मा सरवदे, दिनेश भराडीया,राजू मोरे, समियोद्दीन खतीब , खयामोद्दीन काझी, खालेद चाऊस, अंकुश हेडे, दत्ता सरवदे, आकाश कऱ्हाड, खलील जाफरी, विजय रापतवार, अस्लम शेख यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
