अंबाजोगाई

कन्नडकर वाड्यातील कुलस्वामिनी तुळजाभवानीची घटस्थापना संपन्न

अंबाजोगाई : (प्रतिनिधी)
     प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी अंबाजोगाई शहरात असलेल्या भटगल्ली मधील रहिवासी कन्नडकर यांच्या वाड्यात असलेल्या कुलस्वामिनी तुळजाभवानीची घटस्थापना उत्सहात संपन्न झाली.
    अंबाजोगाई शहरात असलेल्या भटगल्ली मधील रहिवासी कन्नडकर यांच्या वाड्यात असलेल्या कुलस्वामिनी तुळजाभवानीची प्राचीन मूर्ती आसून या ठिकाणीही नवरात्राच्या काळात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. त्यामुळे योगेश्वरीबरोबरच तुळजाभवानीचाही महिमा शहरात कायम आहे.
    योगेश्वरीला मागणी घालण्यासाठी भैरवनाथ बरोबर येडाई व तुळजाभवानी या दोघी आल्या होत्या, अशी दंतकथा आहे. अंबाजोगाईत आलेली हीच ती कन्नकडकरांच्या वाड्यातील तुळजाभवानी देवी होय. वाड्याचे मालक शंकरराव कन्नडकर बांधकाम करीत असताना त्यांना देवीची मूर्ती सापडली. सदरील वाड्याचे बांधकाम २५० वर्षांपूर्वीचे आहे. शंकरराव कन्नडकर यांच्यानंतर त्यांचे पुत्र
यशवंतराव कन्नडकर यांनी देवीची सेवा केली. कन्नडकर हे देवीची पूजा करत असत. विविध मंत्रोच्चारामुळे देवीचे सौंदर्य फुलत ‘गेले आणि भाविकांच्या अपार श्रद्धेमुळे देवीचा महिमा वाढला.
    येथे नवरात्रात कुलधर्म, कुळाचार, देवीची पूजा दरवर्षी होते. नवरात्रात दहा दिवस त्रिकाल आरती, सप्तशती पाठ, कुमारी पूजन, ब्राह्मण व सुवासिनी भोजन, कुमारी भोजन या ठिकाणी होते. ही परंपरा आजही सूर्यकांत कन्नडकर यांनी व त्यांच्या भावांनी सुरू ठेवली आहे.
   कै. शंकरराव पांडे, अशोक जोशी, कै. गोपाळराव पांडे, बालानंद पांडे, कांतराव मांडवकर यांच्या प्रोत्साहनाने १९८० पासून या ठिकाणी कीर्तन, भजन, गायन हे कार्यक्रम पार पडतात. अष्टमीच्या दिवशी महालक्ष्मी पूजन व घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सचिन कन्नडकर व प्रसाद कन्नडकर यांनी दिली.
     प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी आज या ठिकाणी नवरात्रौत्सवा निमित्य उत्सहात घटस्थापना करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!