अंबाजोगाई

घुगे हॉस्पिटल, रोटरी क्लब व आय. एम. ए. च्या वतीने अंबाजोगाईत 6 ऑक्टो. रोजी ‘ संवाद ह्दय रोगाशी ‘ कार्यक्रमाचे आयोजन – रो.डॉ. नवनाथ घुगे.

—————————————-
*अंबाजोगाई/प्रतिनिधी*
अंबाजोगाई शहरात गेल्या 19 वर्षापासून अविरतपणे रुग्ण सेवेत असणार्‍या घुगे हॉर्ट अ‍ॅन्ड क्रिटिकल केअर हॉस्पिटलने 19 वर्ष पूर्ण करुन 20 व्या वर्षात पदार्पण केले आहे. या 19 वर्षाचा प्रवास हा अनेक अडचणीला व संघर्षाला तोंड देत पार करण्यात आला आहे. घुगे हॉस्पिटलच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आणि जागतिक ह्दय दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ” संवाद ह्दयरोगाशी व सी.पी.आर प्रात्यक्षिक ” कार्यक्रम रविवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सायं. ५ वाजता आध्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह नगर परिषद, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच, हार्ट अ‍ॅटक, अचानक होणारे मृत्यू व त्यांची कारणे, उपाय व आपत्कालीन परिस्थिती मध्ये करावयाचे उपचार व सी.पी.आर. याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी लातूर येथील प्रसिद्ध असे कार्डिओलोजिस्ट व हदयरोग तज्ञ डॉ.संजयकुमार शिवपुजे हे मार्गदर्शन करणार असून या कार्यक्रमास अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक तथा घुगे हॉस्पिटलचे संचालक डॉ.नवनाथ घुगे यांनी केले आहे.
घुगे हार्ट अ‍ॅन्ड क्रिटिकल केअर हॉस्पिटलची सुरुवात 2005 साली अंबाजोगाईत करण्यात आली. ज्यावेळी शहरामध्ये ह्दयरोग असेल किंवा इतर अत्यावश्यक रुग्ण सेवेच्या गरजा असतील त्याची कसलीही साधने व सोय उपलब्ध नसताना डॉ.नवनाथ घुगे यांनी हा जोखमीचा प्रयोग सुरु केला. 19 वर्षाची यशस्वी वाटचाल हीच त्यांच्या कामाची पावती आहे. 19 वर्षाच्या कालखंडात अनेक आव्हाने व संकटे यांना तोंड देवून डॉ.घुगे यांनी आता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व अतिदक्षता विभाग ( आय. सी. यू. ) सुरु केले आहे. अत्यावश्यक सेवेसह अतिगंभीर रुग्णांसाठी सर्व अत्याधुनिक सेवासुविधा देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. या हॉस्पिटलचा 19 वा वर्धापनदिन आणि जागतिक ह्दय दिनाच्या नमित्ताने एक सामाजिक व जनजागृतीचा उपक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार घुगे हॉस्पिटल, रोटरी क्लब अंबाजोगाई, आय एम ए अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने ” संवाद ह्दयरोगाशी व सि.पी.आर. प्रात्यक्षिक ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डॉ.संजयकुमार शिवपुजे, यांचे हार्ट अ‍ॅटक, अचानक होणारे मृत्यू व त्यांची कारणे, उपाय व आपत्कालीन परिस्थिती मध्ये करावयाचे उपचार यावर विस्तृत आणि सखोल मार्गदर्शन करणार आहेत. तरी या प्रसंगी पी.डी.जी. रोटरी क्लब, रोगप्रतिबंध आणि उपचार विभागाचे सल्लागार हरिष मोटवाणी साहेब, यांची उपस्थित असणार आहे. सध्याची धावपळीची जीवनशैली, ताण तणाव, चुकीची आहार पद्धती, व्यसन, धुम्रपान यामुळे कमी वयात रक्तदाब, मधुमेह, अति कोलोस्टॉल या सर्व गोष्टीमुळे हार्ट अ‍ॅटक येण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. हार्ट अटॅक व संबधित आजारामुळे दर वर्षी जगामध्ये जवळपास दीड ते दोन करोड लोक मृत्यूमुखी पडतात. त्यातील 65 % मृत्यू हे रुग्णालयात पोहचण्या आधीच होतात.म्हणून हृदय रोगाबद्दल व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याच्या उद्देशाने व सामाजिक दायित्व जोपासत योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो किंवा त्यावर प्रतिबंध करू शकतो यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपचारापेक्षा प्रतिबंध महत्वाचा आहे म्हणून, अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक तथा घुगे हॉस्पिटलचे संचालक डॉ.नवनाथ घुगे, रोटरीचे अध्यक्ष कल्याण, काळे, रोटरीचे सचिव धनराज सोळंकी व सर्व रोटरीचे पदाधिकारी, व आय. एम. ए. अंबाजोगाई चे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!