सुदर्शन रापतवार यांना पत्रकारीता सेवा गौरव पुरस्कार जाहीर १० ऑक्टोबर रोजी होणार वितरण
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
येथील ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांना तात्या-अभय प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात येणारा पत्रकारिता सेवा गौरव पुरस्कार २०२४ नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
अंबाजोगाई येथील तात्या-आभई प्रतिष्ठान च्या वतीने हा पत्रकारिता सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून यासंदर्भात प्रतिष्ठान घ्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की,
आपणास कळविण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, तात्या-आभई आदर्श प्रतिष्ठाण, अंबाजोगाई आयोजीत कै. अण्णासाहेब लोमटे (नवाब) यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी विलासराव देशमुख सभागृह, नगर परिषद, अंबाजोगाई येथे संध्याकाळी ६ हा वाजता पुरस्कार वितरण सोहळा आयोजीत केलेला आहे. त्या पुरस्कार सोहळ्यात आपण पत्रकारिता सेवेच्या माध्यमातुन अतूलनीय व विशेष अनमोल कार्य केलेले असुन ते तुमचे कार्य म्हणजे समाजासाठी मोठे योगदान आहे. त्या कार्याची दखल घेवून आमच्या संयोजन समितीने तुम्हास “पत्रकारिता सेवा गौरव पुरस्कार २०२४” हा देण्यासाठी तुमची निवड केलेली आहे. तरी विनंती की, आपण हा सन्मान स्वीकारण्यास स्वीकृती देऊन दि.१० ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६:०० वा कार्यक्रमस्थळी सहकुटुंब सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित राहावे. अशी विनंती तात्या-आभई प्रतिष्ठान चे सचिव ऍड. राजेंद्रप्रसाद माणीक धायगुडे यांनी केली आहे.
सुदर्शन रापतवार हे ज्येष्ठ पत्रकार असून गेली ४० वर्षे सातत्याने त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रातुन वृत्त संकलनाची भुमिका निभावली आहे. यापुर्वी पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील भरीव कामाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सदरील पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
