*राज्यस्तरीय आरोग्य दूत पुरस्काराने सय्यद समीर वजीर कोल्हापूर येथे सन्मानित*
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
समर्थ सोशल फाउंडेशन जनरल हॉस्पिटल व न्यूट्रीफिल्स हेल्थ प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड भारत अभियान अंतर्गत झालेल्या सन्मान सोहळ्यात अंबाजोगाई चे सय्यद समीर वजीर यांचा आरोग्य दूत म्हणून कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले
मागील एक वर्षापासून अंबाजोगाई शहरामध्ये व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती यासाठी दिवस-रात्र कष्ट घेऊन साधारण दोनशे ते तीनशे मधुमेह व व्यसनाधीन लोकांना ह्या समर्थ सोशल फाउंडेशन जनरल हॉस्पिटल व न्यूट्रीफिल हेल्थ प्रोडक्ट ची माहिती देऊन
त्यापैकी पन्नास ते साठ लोकांना याचा नक्कीच फायदा झाला आहे मधुमेह ग्रस्त असलेल्या लोकांना सोशल फाउंडेशन ची व त्यांच्या प्रोडक्टची माहिती देऊन मधुमेह बऱ्यापैकी मुक्त केल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची वर्षभरात केलेल्या कामाची दखल घेऊन सय्यद समीर वजीर यांना काल दिनांक 29 सप्टेंबर रोजी कोल्हापूरच्या सयाजी इंटरनॅशनल हॉटेल येथे झालेल्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले यावेळी समर्थ सोशल फाउंडेशन आणि न्युट्रीफील हेल्थ प्रॉडक्ट्स संस्थापक आद्यक्ष श्री सादिक शेख , संचालक सुहास पाटील ,संचालक सागर देसाई संचालक अस्लम शेख , झोनल ऑफिसर सय्यद रफिक शरीफ मुलाणी सर आदी मान्यवर या सन्मान सोहळ्याला उपस्थित होते
सय्यद समीर वजीर यांना मराठवाडा झोन (बीड लातूर नांदेड अहमदपूर ) मधून राज्यस्तरीय मधुमेह व व्यसनमुक्ती दूत म्हणून सन्मानित करण्यात आले .यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कोणी जर व्यसन , मधुमेह किंवा इतर आजाराने ग्रस्त असेल तर ते त्या लोकांना आयुर्वेदिक पद्धतीने बरे होतील अशी आशा करू जे गरजू असतील त्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सय्यद समीर वजीर यांनी केले आहे
