अंबाजोगाई

*स्वामी रामानंद तीर्थ जयंती उत्सवा निमित्य योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम*

*स्वामी रामानंद तीर्थ जयंती उत्सवा निमित्य योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम*

अंबाजोगाई –

योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ यांच्या १२१ व्या जयंती उत्सवानिमित्त ०३ ऑक्टोबर गुरुवार रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
सकाळी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास पुष्पांजली व गायकांचा भजनावली कार्यक्रम तसेच प्रख्यात लेखक गिरीश घाटे यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावर तयार केलेल्या संकेतस्थळाचे लोकार्पण योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे यांच्या शुभहस्ते होणार आहे. नाशिक येथील ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांचे ‘स्वामी रामानंद तीर्थ यांचे मराठवाड्यासाठी योगदान’ या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर हे उपस्थित राहणार आहेत तर रात्री साडेआठ वाजता होणाऱ्या शास्त्रीय संगीत सभेत प्रख्यात कलावंतांचे सोलो यांचे एकत्रित सादरीकरण असून जगविख्यात पखवाज वादक उद्धव बापू आपेगावकर यांचे पखवाज वादन,दक्षिण कोरियातील कलावंत श्री वोन सोग यांचे गायन होणार आहे तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष जी.बी.व्यास कार्यकारी उपाध्यक्ष ऍड.जगदीश चौसाळकर, सचिव कमलाकर चौसाळकर व इतर संचालक यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!