परळी वैजनाथ

*परळी विधानसभा मतदारसंघातील अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावुन केंद्रीय राखीव पोलीस दलाचा विशेष बंदोबस्त लावण्याची ऍड माधव जाधव यांची निवडणूक आयोगाकडे मागणी*

……………………………………….
…………………………………………..
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
    विधानसभा निवडणुकी मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातील अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावून, केंद्रीय राखीव पोलीस दलाचा विशेष बंदोबस्त लावून बोगस मतदान रोखण्याची मागणी ऍड माधव जाधव यांनी केली आहे.
    या संदर्भात ऍड माधव जाधव यांच्या कडुन निवडणूक आयोगा कडे जी तक्रार करण्यात आली आहे त्यात म्हंटल आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघातील परळी विधानसभा मतदार संघ २३३ या विधानसभेमध्ये एकुण ३४० मतदान केंद्र आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदार संघातील एकुन १२२ मतदान केंद्रावर मोठया प्रमाणात बोगस मतदानाच्या घटना घडलेल्या आहेत. मतदान केंद्र ताब्यात घेवुन मतदारांना मतदान न करू देता दोन ते तीन लोकांनीच मतदान केले. तसेच मतदारांच्या बोटांना मतदान केंद्राच्या बाहेरच शाई लावुन मतदारांना मतदान करू दिले नाही. त्यांचे आधार कार्ड व मतदान कार्ड दुसऱ्यांनीच वापरून बोगस मतदान केले. कर्मचाऱ्यांना मारहाण केली व धमक्या दिल्या.
तसेच काही ठिकाणी मयत व्यक्तींचे मतदान करण्यात आले आहे. संपुर्ण मतदान केंद्र ताब्यामध्ये घेवुन बोगस मतदान केले आहे.
    या तक्रारी मध्ये ऍड जाधव यांनी त्या सर्व मतदान केंद्राची यादी व तसेच त्या मतदान केंद्रावर आता झालेल्या लोकसभेमध्ये बीजेपी चे उमेदवाराला व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला एकूण किती मते पडली याची सविस्तर आकडेवारी ही दिली आसुन बोगस झालेल्या 122 मतदान केंद्रावर बीजेपीच्या उमेदवाराला 75853 मते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला केवळ 4342 मते पडलेले आहेत.
या प्रकारे मतदान केंदावर मतदारांना मतदानाचा लोकशाही मार्गाने हक्क बजाऊ दिला नाही हे स्पष्ट झाले आहे. काही मतदान केंद्रावरील सी. सी. टी. व्हि कॅमेरे जाणीवपुर्वक बंद ठेवण्यात आले होते असेही त्यांचे मत असून
येणाऱ्या विधानसभा निवडणुकी मध्ये लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी व मतदारांना त्यांना घटनेने दिलेला मतदानाचा हक्क कोणत्याही दबावाखाली न येता बजाऊन मतदान करण्यासाठी वरील संपुर्ण मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील घोषित करून संपूर्ण मतदान केंद्रावर चालू स्थितीमध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत व तसेच विशेष पोलीस बंदोबस्त म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात याव्यात. अशा प्रकारची मागणी या तक्रारी मध्ये ॲड. माधव जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!