सोलापूर येथील कोळी महादेव मल्हार कोळी समाजाच्या आमरण उपोषणास अंबाजोगाई परभणी कोळी महादेव मल्हार कोळी समाजाचा पाठिंबा
…..
अंबाजोगाई प्रतिनिधी
सोलापूर येथे सकल कोळी महादेव मल्हार कोळी टोकरी कोळी ढोर कोळी समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने बाळासाहेब बळवंतराव ,दत्ताभाऊ सुरवसे ,सुरज खडाखडे ,समाधान घंटे ,मशाप्पा कोळी या बांधवांनी विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाला मराठवाड्यातील अंबाजोगाई परभणी बीड धाराशिव आदी जिल्ह्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी आदिवासी जमातीच्या वतीने शुक्रवार रोजी भेट देऊन पाठिंबा देण्यात आला आहे.
आज जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न अतिशय अवघड झाला आहे. आपल्या पूर्वजांच्या, नातलगांच्या जुन्या नोंदी कोळी अशा आहेत आणि कोळी नोंदीमुळे आपली जात पडताळणीची प्रकरणे पडताळणी समिती अवैध करीत आहे आणि कोळी नोंदी मुळे उच्च न्यायालय पण जात वैधता प्रमाणपत्र देत नाही. कोळी नोंद ही आपली मुख्यअडचण ठरत आहे. पण त्याचवेळी पुणे, ठाणे, नगर, नाशिक व रायगड या जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील लोकांच्या नोंदी कोळी असूनही त्यांना जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र सहज मिळते. त्यांना ज्याप्रमाणे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळते त्याच समान न्यायाने आम्हालाही जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, त्यांची कोळी नोंद जशी अडचण ठरत नाही त्याचप्रमाणे आम्हालाही कोळी नोंद मान्य करून जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र द्यावे. त्यासाठी परिपत्रक काढावे, ह्या केवळ एकाच मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील महादेव कोळी जमातीचे लढवय्ये संघर्ष योध्दे बाळासाहेब बळवंतराव ,दत्ताभाऊ सुरवसे , सुरज खडाखडे , समाधान घंटे , माशाप्पा कोळी आमरण उपोषणास बसले आहेत. कोळी नोंदी मान्य करून परिपत्रक निघाल्याशिवाय ते आमरण उपोषण सोडणार नाहीत अशी ठाम भूमिका घेतली आहे.
उपोषणकर्त्यांनी महाराष्ट्रातील कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीच्या बाबतीत असलेल्या ब्रिटिशकालीन, निजामकालीन, शासकीय गॅझेटीअर्स, जनगणना,संशोधकांचे अहवालाच्या आधारे जुन्या नोंदी “कोळी” असल्या तरी माजी आदिवासीं मंत्री मधुकर पिचड व आदिवासी संचालक स्व. गोविंद गारे यांच्या निकषानुसार समान न्यायाने जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्र परिपत्रक काढून अन्याय दूर करावा.
ता .7/8/24/रोजीचा मंत्री मंडळाने मंजुर केलेले अनुसूचीत जाती जमाती जात पडताळणी अधिनियम सुधारणा विधेयक तात्काळ मागे घेवुन तात्काळ रद्द करावे.
वेगवेगळे व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या जात वैधता प्रमाणपत्र अभावी रोखून ठेवलेल्या पदव्या द्याव्यात. या मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या असून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. मराठवाड्यातील आदिवासी कोळी महादेव मल्हार कोळी समाजाच्या वतीने या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा देण्यात आला. सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास मराठवाड्यात देखील तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठवाड्यातील आदिवासी कोळी महादेव मल्हार कोळी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी रमेश पिटलवाड ,निवृत्ती रेखडवाड, संतोष कोळी, गणेश सूर्यवंशी ,बाबांना इंगळवाड ,अच्युत सोंगे ,रोहिदास यमबवाड ,अरुण दहिभाते ,महादेव यशवंत ,अरुण मेकेवाड, विश्वास मेकेवाड आधी मराठवाड्यातील आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.
