*अंबाजोगाई शहरात कमरेला गावठी कट्टा(पिस्टल) लावून फिरणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे शाखा-बीडच्या पथकाने रंगेहात पकडले 44 हजार किंमतीचा एक गावठी गट्टा जप्त*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहरात कमरेला गावठी कट्टा(पिस्टल) लावून फिरणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे शाखा-बीडच्या
पथकाने रंगेहात पकडुन त्याच्या कडुन 44 हजार किंमतीचा एक गावठी गट्टा जप्त करण्यात आला आहे.
मा.पोलीस अधीक्षक,बीड अविनाश बारगळ यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक श्री.उस्मान शेख स्था.गु.शा.बीड यांना अवैध धंद्दे विरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिल्याने दिनांक 27/09/2024 रोजी स्थागुशा येथील पोह/मारुती कांबळे यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती आधारे अंबाजागाई शहरात यशवंतराव चव्हाण चौक येथे येथे एक इसम कमरेला गावठी कट्टा लावुन फिरत असल्याची खात्रीशिर बातमी मिळताच स्थागुशा पथक श्री. उस्मान शेख पो.नि.स्थागुशा बीड यांचे आदेशावरुन कारवाई कामी तात्काळ पाचारण होवून यशवंतराव चव्हाण चौकात सापळा लावला तेथे एक इसम संशयीत रित्या मिळुन आला त्याचे नाव अमित उर्फ सोन्या सुंदर गायकवाड रा. सदर बाजार अंबाजोगाई असे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याचे जवळ एक गावठी बनावटीची पिस्टल व चार जिवंत काडतुस अवैधरित्या मिळुन आले आहे. सदर आरोपीस ताब्यात घेवुन गावठी पिस्टल व जिवत काडतुस किंमत अंदाजे 44000/- रु मुद्येमाल जप्त करण्यात आला.
पो.स्टे. अंबाजोगाई शहर येथे आरोपी विरुध्द भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून
सदरची कामगिरी मा.श्री. अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक,बीड , मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, पोनि श्री. उस्मान शेख स्था.गु.शा.बीड यांचे मार्गदर्शनाखाली ग्रेपोउपनि हनुमान खेडकर, पोह/मारुती कांबळे, राजु पठाण, महेश जोगदंड, तुषार गायकवाड व चालक गणेश मराडे यांनी केली आहे.
