*खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखालील भक्तीस्थळ ते शक्तीस्थळ वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचे अंबाजोगाई शहरात भव्य स्वागत*
अंबाजोगाई – (प्रतिनिधी)
भाजपाचे खासदार. डॉ. अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भक्तीस्थळ ते शक्तीस्थळ, वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचे अंबाजोगाई शहरात वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली भक्तीस्थळ ते शक्तीस्थळ, वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा काढण्यात आली असून दि.५ सप्टेंबर रोजी या यात्रेला प्रारंभ झाला आहे. ६ हजार किलोमीटर पेक्षा अधिक अंतर पार करत २२ जिल्ह्यातील ४४ विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात ही यात्रा संपन्न झाली आहे. दि.२५ सप्टेंबर रोजी ही सन्मान यात्रा अंबाजोगाईत आली यावेळी वीरशैव लिंगायत समाजाकडून यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते विनोद पोखरकर यांच्या घरी खा. डॉ. गोपछडे यांचा भव्य असा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. बी आय खडकभावी, नितीन शेटे, बसवेश्वर यादव, बलभीम धारेवर, प्रशांत बनाळे, प्रसाद कोठाळे, सुरज अकुसकर, गणेश रुद्राक्ष, मयूर वारद, अक्षय देशमाने यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना अजित गोपछडे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी जेवढं मराठा समाजावर प्रेम केले तेवढं कुणी केलं नाही, ओबीसी मधून वीरशैव लिंगायत समाजाला आरक्षण देण्याची प्रमुख मागणी असून आरक्षणाच्या मुद्द्यावरून उध्दव ठाकरेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी टीका केली आहे. हिंदुत्वाचा संदेश देणारी ही यात्रा असून अठरा पगड जातीला एकत्र करणारी यात्रा असल्याचे राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे म्हणाले.
