कर्ण कर्कश्य आवाजाचे हॉर्न व सायलेन्सर लावून गावभर दुचाकी घेऊन मिरवणाऱ्या धनदांडग्या बापांच्या औलादीला पोलिस पथकाने ताब्यात घेऊन केली कार्यवाही
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई व पंचक्रोशी मध्ये कर्ण कर्कश्य आवाजाचे हॉर्न व सायलेन्सर लावून गावभर दुचाकी घेऊन मिरवणाऱ्या धनदांडग्या बापांच्या औलादीला अद्दल घडवण्या साठी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शना खाली बीड व अंबाजोगाई वाहतूक शाखेच्या पथकाने दुचाकी ताब्यात घेऊन हॉर्न व सायलेन्सर काढून घेऊन दंडात्मक कार्यवाही केली व त्यांना चांगलाच धडा शिकवला
मागील अनेक वर्षा पासून अंबाजोगाई व पंचक्रोशी मध्ये काही राजकीय पाठबळ असलेल्यांच्या औलादी, धनदांडग्या बापाच्या औलादी लाखो रुपयांच्या बुलेट सह अन्य दुचाकी पोलिसांच्या नाकावर टिच्चून विना नंबर पळवणे, दुचाकीवर फॅन्सी नंबर टाकणे, दुचाकीवर स्वार होऊन या दुचाकींना कर्ण कर्कश्य आवाजाचे हॉर्न व सायलेन्सर लावून गावभर मिरवत असल्याने याचा त्रास रस्त्याहून चालणाऱ्या पादचारी व्यक्ती सह रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या रहिवाशांना सुद्धा मोठ्या प्रमानावर होत आहे.
या संदर्भात असंख्य नागरिकांच्या तक्रारी पोलीस स्टेशन पर्यंत आल्या होत्या. मात्र पोलीस खात्या कडे अपुरे मनुष्य बळ असल्या कारणाने या बडे घर की बिगडी हुयी औलादीवर कुठलीच कार्यवाही होताना दिसत नव्हती.
वाहनधारकांच्या कर्णकर्कश सायलंसरच्या आवाजाने अंबाजोगाई शहरातील नागरीक त्रस्त झाले होते याबाबत प्रसार माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांच्या पथकाने आज गुरुवार दि 26 रोजी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 180 वाहनधारकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 1 लाख 30 हजार 200रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
बीड वाहतूक पोलीस शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप , पोलिस उपनिरीक्षक हणुमंत घोडके, पवार, वाहतूक पोलीस बजरंग ठोंबरे, नारायण दराडे, नितीन काकडे, आर. टी. पवार, आदिनाथ मुंडे, वसीम शेख, अरुण राऊत, त्रिंबक फड , महिला पोलिस गायकवाड, बालासाहेब पारवे, ,मधुकर रोडे , राधा काळे, दिपाली बोंडले या वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबविली.
180 वाहनांवर कारवाई केली म्हणजे मोहीम संपली नव्हे
अंबाजोगाई शहरात बीड वाहतूक पोलीस शाखेचे पथक आठ दिवसातून एकदा येऊन अश्या कारवाया करणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत असलेल्या वाहनधारकांवर कारवाई केली जाणार आहे.कारवाईची मोहीम संपली असे वाहनधारकांनी समजू नये –
सुभाष सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा बीड
