अंबाजोगाई

भगवान परशुराम महामंडळ स्थापनेच्या निर्णयाचे फटाक्यांची आतिषबाजी करत पेशवा प्रतिष्ठान तर्फे स्वागत..

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

ब्राह्मण समाजासाठी राज्य सरकारने अखेर भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मंजूर केल्याबद्दल अंबाजोगाई येथील स्वा. सावरकर चौकात मोठया प्रमाणात आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. सुरुवातीला स्वा. सावरकर यांना अभिवादन करण्यात आले
यावेळी पेशवा प्रतिष्ठान चे राहुल कुलकर्णी, डॉ महेश अकोलकर, डॉ संकेत तोरंबेकर, श्रीकांत जोशी, केदार दामोशान , पार्थ कुलकर्णी, दीपक कुलकर्णी,ॲड वैजनाथ वांजरखेडे, विशाल जहागीरदार, उप जिल्हाप्रमुख गजानन मुडेगावकर, शिवसेना नेते शिवाजी दादा कुलकर्णी, दीनदयाल बँकेचे संचालक मकरंद कुलकर्णी, दुर्गादास दामोषण, शरद देशपांडे, पद्माकर सेलमोकर,विवेक वालेकर, अभय जोशी, निलेश जोशी, श्रीपाद देशमुख, माऊली केंद्रेवाडीकर,पंडित विडेकर ,श्री महाजन, प्रदीप नांदगावकर,श्री बाभुळगावकर, मंदार काटे यांच्यासह ब्रह्मवृंदाची उपस्थिती होती. यावेळेस राहुल कुलकर्णी यांनी युती सरकारचे मुख्यत्वे करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले . तसेच महामंडळ व्हावे यासाठी दोनदा आमरण उपोषणाला बसलेले ब्राह्मण योद्धा दीपक रणनवरे व बाजीराव धर्माधिकारी यांनी हे महामंडळ स्थापन करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!