अंबाजोगाई

*मनोज दादा जरांगे यांच्या समर्थनार्थ अंबाजोगाई,- लातूर रोड वरील सेलू आंबा टोलनाक्यावर भर पावसात कार्यकर्त्यांचा रास्ता रोको*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
      मराठा आरक्षणाच्या लढाई साठी उपोषणास बसलेले मनोज दादा जरांगे यांच्या समर्थनार्थ पुकारलेल्या बीड जिल्हा बंदला अंबाजोगाई शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाल्या नंतर सकल मराठा समाजाच्या वतीने आज सकाळ पासून सर्व दूर मुसळधार पाउस असतानाही अंबाजोगाई-लातूर रोड वरील सेलू आंबा टोल नाक्या वर रास्ता रोको करण्यात आला.
    मराठा समाजास ओबीसी कोठ्यातून आरक्षण मिळावे या साठी मागील 1 वर्षा पासून मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वा खाली नेते वगळता संपूर्ण मराठा समाज एकवठला असून या साठी मोर्चा, धरणे, बंद, उपोषण ही आंदोलनात्मक पावले उचलली जात आहेत. अंतरवली सराटी मधून सुरू झालेला हा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत असून मनोजनदादा जरांगे हे मागील दहा दिवसा पासुन अंतरवाली सराटी मध्ये चौथ्यांदा आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली असल्याने त्यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने चार दिवसा पूर्वी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला पाठिंबा देण्यासाठी अंबाजोगाई शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीनेही अंबाजोगाई बंद ची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये शहरातील सर्वच भागातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने 100 टक्के बंद ठेऊन पाठिंबा दर्शवला होता.
     मागील उपोषणा प्रमाणे यावेळेस शासनाने जरांगे यांच्या उपोषणा कडे गांभीर्याने न पाहिल्याने व शासनाचा प्रतिनिधीही उपोषणा कडे फिरकत नसल्याने त्यांचे उपोषण दहा दिवसा पासून सुरूच असून त्यांची प्रकृती खालावत जात आहे.
     त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सरकारचे लक्ष उपोषणा कडे वेधण्यासाठी आज अंबाजोगाई पंचक्रोशीनमधील सकल मराठा समाजाच्या वतीने अंबाजोगाई सह राज्यभर प्रचंड अतिवृष्टी सुरू असताना अंबाजोगाई-लातूर रोड वरील सेलू आंबा टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!