जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत कै. दादाराव कराड विद्यालयाचे घवघवीत यश.*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत अंबाजोगाई येथील माईर एम आय टी पुणे संचलित कै दादाराव कराड विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दिनांक 23 /09/2024, वार सोमवार रोजी जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन बीड येथे करण्यात आले होते या क्रीडा स्पर्धेत *माईर एम आय टी पुणे संचलित कै. दादाराव कराड माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई* येथील चि. स्वराज नितेश शिराळे या विद्यार्थ्यानी तायक्वांदो या क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला व सिल्व्हर मेंडल मिळवले त्याबद्दल विद्यार्थी स्वराज नितेश शिराळे यांचे संस्थेचे संस्थापक मा. डॉ. श्री. वि.दा. कराड, अंबाजोगाई स्कूल डिव्हीजन चे कार्यकारी संचालक मा. श्री राजेशजी कराड व सौ. शुभांगी ताई कराड, संचालक संगप्पा तलेवाड, प्राचार्य श्री रामराजे कराड क्रीडा शिक्षक श्री घुले पी एस व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
