नियोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर न प उद्यानाच्या ओपन स्पेस वरील अतिक्रमण काढण्याची परिसरातील नागरिकांची मागणी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
ज्योती नगर कॉलनीतील नियोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर न प उद्यानाच्या ओपन स्पेस वरील मागील वीस वर्षापासून असलेले अतिक्रमण काढण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
अंबाजोगाई शहरातील ज्योती नगर कॉलनीतील सर्व महिला, पुरुष यांनी आज एकत्र येऊन कॉलनी मधील
नियोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर न प उद्यानाच्या ओपन स्पेस वरील ओपन स्पेसवर काही नागरिकांनी केलेले आतिक्रमण हटवण्यासाठी मा. मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद आंबेजोगाई, मा. तहसीलदार साहेब अंबाजोगाई., मा. पोलीस निरीक्षक अंबाजोगाई यांना निवेदन दिले.
या वेळी गोरख बापू मुंडे, संभाजी बनसोडे, प्रा. कमलाकर कांबळे, आशोक आखाते, गुलाबराव वाघमारे, मनोहर हेडे, हनुमंत मुंडे, मोहन मुंडे, अमोल शिंदे, अदित्य आपेट, बालाजी उखळे, अविनाश शिंदे, छत्रभुज जांगिड, डी एन आपेट, संदीपान पवार, रवि दराडे, कमलाकर हेडे, गोविंद शिंगाडे, तागडे सर, लताबाई शिंदे, उर्मिला हेडे, पार्वती शिंगाडे, गवळन बाई सारुक, बनसोडे मॅडम, ऑगळे मॅडम, सुरेखा आखाते, सौ शालिनी मुंडे, शोभा बनसोडे, शालुबाई गोरे, संतोषी जांगिड, द्वारीका पवार, सागर नेटके, मुंडे बाई राजमती वाघमारे यांची उपस्थिती होती.
