योगेश्वरीचा वृक्ष लागवड पॅटर्न महाराष्ट्रातील संस्थांनी राबवावा डॉ. बाबासाहेब ठोंबरे* *वृक्ष लागवड जना आंदोलनात सहभागी होण्याची गरज – डॉ. सुरेश खुरसाळे*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
योगेश्वरीचा वृक्ष लागवड पॅटर्न महाराष्ट्रातील संस्थांनी राबवावा असे मत लातुरच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे यांनी व्यक्त केले ते योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने वनसंवर्धन कार्यशाळेत बोलत होते
याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक डॉ.सुरेश खुरसाळे ,संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर,सचिव कमलाकर चौसाळकर , संचालक अभिजित लोहिया शिवाजी गिरी एस पी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते . याप्रसंगी बोलताना प्राचार्य ठोंबरे म्हणाले की मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची गरज आहे त्या अनुषंगाने योगेश्वरी शिक्षण संस्थेने घेतलेली वनसंवर्धनावरील कार्यशाळा अतिशय महत्त्वाची असून अशा माध्यमातूनच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची चळवळ सुरू होत असते हे आंदोलन प्रामुख्याने युवक सहभागी झाले पाहिजे कारण पुढील काळात युवक हेच देशाचे आधारस्तंभ असून त्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड झाल्यास परिसर सुजलाम सुफलाम होईल शिवाजीराव गिरी म्हणाले की आज पूर्वीसारखी वने जगली पाहिजे वनाच्या संवर्धन संरक्षण झाले पाहिजे जेणेकरून सर्वांना जगण्याचा अधिकार आहे प्राण्यांबरोबर मैत्री प्राण्यांची भाषा त्याच बरोबर त्यांच्याशी नाते हे जोडण्याची देखील गरज आहे प्रा. अभिजीत लोहिया म्हणाले की मुलांनी पुस्तके ज्ञानाबरोबरच वृक्षाचाही अभ्यास करावा वृक्ष लागवड करावा विविध उपक्रमात वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन आणि त्याची जोपासना अत्यंत महत्त्वाची असून ऑक्सिजनचा साठा ही देखील वृक्ष लागवडीचे प्रमुख कारण आहे अध्यक्ष समारोप डॉ. सुरेश खुरसाळे यांनी योगेश्वरी शिक्षण संस्थेचा परिसर हा पूर्वी उजाड होता अल्प प्रमाणात झाडे होती परंतु झाडांचे प्रमाण वाढवून या परिसराला नंदनवन करण्याचे काम युवकांनी केले त्यांच्यावर सातत्याने पर्यावरणीय मूल्यांची रुजवन केली जलजमीन जंगल याविषयी अंतरिक जीवन निर्माण होण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केलेआपल्या अभ्यासास बरोबरच चौकटी बाहेरचे देखील ज्ञान महत्त्वाचे आहे विद्यार्थी हा वृक्ष मित्र असला पाहिजे त्यामुळेच त्यांना अशा कार्यशाळेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले पाहिजे असेही ते म्हणाले कार्यशाळेच्या प्रारंभी निसर्ग नमन व वृक्ष प्रतिज्ञेने झाली यावेळी छात्रांना दिलीप कुलकर्णी लिखित हरित संदेश यापुस्तकाचे वितरण करण्यात आले प्रास्ताविकात प्राचार्य डॉ कानेटकर म्हणाले की , कार्यशाळेतून वन सर्वधनाचा उद्देश तरुणांना होण्यासाठीच आयोजन केले असल्याचे सांगितले डॉ. राजकुमार थोरात महेंद्र आचार्य यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य आर.व्ही . कुलकर्णी,डॉ.साधना चामले,अधिक्षक अजय चौधरी प्रा.काळे यांच्यासह इतरांनी प्रयत्न केले.
