अंबाजोगाई

पोखरी येथील जलजीवन मिशन योजने अंतर्गत झालेल्या निकृष्ट दर्जाचे बोगस काम.

उच्यस्तरीय चौकशीसाठी पोखरीचे दौलत निकम यांच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणाचा आजचा दुसरा दिवस.

अंबाजोगाई [प्रतिनिधी ]

अंबाजोगाई तालुक्यातील पोखरी येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत झालेले काम सबंधीत गुत्तेदाराने अभीयंता,ग्रामसेवकास हताशी धरुण अंत्यत निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. त्या निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी दोषीवर कार्यवाही करण्याची लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, पालकमंत्री,खासदार, जिल्हाधीकारी,गटविकास अधिकारी, उपजिल्हाधीकारी यांच्याकडे विद्यमान उपसरपंच दौलत किसनराव निकम यांनी तिन अठवड्यापुर्वी मागणी केली होती. तरीसुद्धा सबंधती विभागाने आजपर्यंत कसलीच चौकशी केली नाही. त्यामुळे दौलत निकम यांनी १९ सप्टेंबर पासुन येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.तालुक्यातील पोखरी गावात पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत असल्यामुळे जि.प. बिड अंतर्गत शासनाची जलजीवन योजना मंजूर झाली आहे. या योजने करीता शासनाकडुन ९० लाख५१ हजाराच्या आसपास निधी मंजूर झालेला आहे.सदरील योजने अंतर्गत सार्वजनिक विहीर, गावांतर्गत नळ योजना व पाण्याची टाकी बांधणे या कामासाठी तरतुद करण्यात आलेले आहे.परंतु सदरील झालेले काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे व बोगस पध्दतीने उरकाउरक करण्यात आले आहे.संबंधित काम करणाऱ्या गुत्तेदाराने मंजूर कृत्ती अराखाड्या प्रमाणे काम न करता मनमानी करत निकृष्ट दर्जाचे बोगस काम केले आहे. पाईपलाईन खोल न गाडता वरच्यावर गाडली आहे.
त्यामुळे सदरील पाईप भवीष्यात मोडण्याची व तुटण्याची शक्यता आहे.तसेच गावातील गल्लीत पाईप लाईन प्रधान्य न देता गावाच्या बाहेरून केली आहे. सदरील पाईपलाईनचा लाभ सर्वसामन्याना न देता केवळ हितसंबंध जोपासुन गावातील काही भागात पाईपलाईन केल्याचे पाहायला मिळत आहे. या शिवाय नवीन विहिरीला विहिरीचा आकार न देता केवळ खड्डा खोदल्यासारखी स्थिती पाहायला मिळत आहे.अंत्यत हलक्या दर्जाचे व कमी प्रतिचे सिमेंट वापरून विहरीचे व टाकीचे काम उरकले आहे.तसेच पाईपलाईनसाठी लागणारे पाईप सुध्दा हलक्या प्रतीचे वापरलेले आहेत.अनेक सुज्ञ नागरीकांनी व उपसरपंच दौलत निकम यांनी सदरील निकृष्ट कामाबाद अभियंता यांना अनेकवेळा फोनव्दारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संबंधीत अभियंता यानी फोन घेतला नाही.त्यामुळे संबंधित ग्रामसेवक व ग्रामपंचायतीच्या संबंधिताना तसेच गुत्तेदाराकडे या निकृष्ट कामाबाबत नाराजी व्यक्त करुन कामाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्याची अनेकवेळा विनंती केली.तरीही त्यांनी या कामाकडे डोळे झाकत करत त्यावेळी कामाची उरकाउरक केली आहे. हे काम सध्या स्थितीत काम पुर्ण होत असले तरी सदरील जलजीवन मिशनचे काम अत्यंत निकृष्ट व बोगस दर्जाचे झालेले आहे.त्यामुळे सदरील कामाचे योग्य यंत्रणे मार्फत ऑडीट करुन तसेच सखोल चौकशी करून दोषी गुत्तेदार,अभियंता, संबधीत ग्रामसेवक आणि इतर दोषी,अधिकारी,कर्मचारी यांच्यावर योग्य ती कडक कार्यवाही करण्याची लेखी निदेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री धनंजय मुंडे जिल्हाधीकारी बिड, गटविकास अधिकारी व उपजिल्हाधीकारी अंबाजोगाई यांच्याकडे २६ ऑगस्ट रोजी मागणी केली होती.१०सप्टेंबर पर्यंत योग्य त्या यंत्रणे मार्फत ऑडीट व सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा पोखरी ग्रामस्थासह १९ सप्टेंबर २०२४ रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आसल्याचा लेखी इशारा उपसरपंच दौलत किसनराव निकम यांनी दिला होता. तरी सुध्दा आजपर्यंत या कामाची कसलीच चौकशी केली नाही. त्यामुळे दौलत किसनराव निकम यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणस्थळी पोखरी ग्रामस्थ, मा. आ. पृथ्वीराज साठे,मा. सभापती राजेसाहेब देशमुख, काँ. बब्रूवहान पोटभरे, सामाजीक कार्यकर्त्या सुलभा सोळंके, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी भेट देऊन पाठींबा दर्शवला आहे.निकृष्ट दर्जाच्या बोगस कामाची चौकशी करूण दोषीवर कार्यावाही झाल्याशिवाय अमरण उपोषण थांबवणार नसल्याची माहिती दौलत निकम यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!