२८ सप्टेंबर, २०२४ रोजी अंबाजोगाई मध्ये लोकन्यायालयाचे आयोजन
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : दिनांक २८ सप्टेंबर, २०२४ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, अंबाजोगाई येथे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक जिल्हा न्यायालय अंबाजोगाई यांनी दिली आहे. दिनांक २८ सप्टेंबर, २०२४ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालया मध्ये दाखलपुर्व प्रकरणे, धनादेश अनादराची प्रकरणे, दिवाणी दावे, बँकाची कर्ज प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई, भुसंपादन प्रकरणे, कौटूंबिक कलह प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. या प्रकरणांमध्ये तडजोड झाल्यास शंभर टक्के न्यायालयीन शुल्क परत मिळते. त्यामुळे राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये आपसांत तडजोड करून आपले दाखलपुर्व व प्रलंबीत दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मा. दिपक द. खोचे, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१, अंबाजोगाई व वकीलसंघाचे अध्यक्ष एड. जयंत. यु. भारजकर यांनी जनतेस केलेले आहे.
