परभणी फेस्टिव्हल अंतर्गत राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत अंबाजोगाईच्या आस्था डांगेने पटकावले प्रथम पारितोषक
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :
परभणी महानगरपालिका आयोजित परभणी फेस्टिव्हल अंतर्गत राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे प्रथम पारितोषिक अंबाजोगाई येथील आस्था अमोल डांगे हिने, द्वितीय उत्तरप्रदेशातील सर्वेश व याशी यांनी तर तृतीय पारितोषिक नांदेड येथील फ्लाईंग डान्स अकॅडमीने पटकावल्या मुळे आस्था डांगे हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. परभणी येथील बी. रघुनाथ सभागृहात स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते यांच्या हस्ते झाले. यावेळी महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.के. आंधळे, अध्यक्ष नासिरखान पठाण, करण गायकवाड, कुणाल भारसाखळे, अभिजीत कुलकर्णी, मनोज तळेकर, विनय ठाकूर, जलील, सचिन पाचपुंजे, विशाल उफाडे आदी उपस्थित होते. या राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेत महाराष्ट्रासह झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. परीक्षक म्हणून नृत्य कलावंत व दिग्दर्शक शेख जावेद व नृत्य दिग्दर्शक गंगा गवळी यांनी काम पाहिले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सहाय्यक आयुक्त सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे, सहाय्यक आयुक्त प्रिया गोरखे यांच्या हस्ते झाले. कर्मचारी संघटनेचे सचिव के. के.भारसाकळे, राजूभाऊ मोरे, भगवान यादव, सुधाकर किंगरे, राजेभाऊ कामखेडे, प्रकाश गायकवाड, शेख इस्माईल आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके, करंडक प्रदान करण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिके गंगाखेड येथील प्रियंका अवचार, परभणी येथील प्रशिक कापसे व जुनेश शेख यांना तसेच गीतांजली डान्स अकॅडमी हिंगोली, सागर दास नांदेड, अक्षया भालेराव गंगाखेड, आयुष डान्स अकॅडमी परभणी यांना देण्यात आली.ही स्पर्धा यशस्वीतेसाठी संयोजक विशाल उफाडे, गौतम वडमारे, केशव पैके, विकास शिंदे, राजकुमार जाधव आदींनी पुढाकार घेतला. दरम्यान आस्था डांगे हिने मिळवलेल्या यशा बद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
