वाहन चालक दिनानिमित्त बस चालकाचा सन्मान
प्रतिनिधी (अंबाजोगाई) .. जागतिक वाहन चालक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व सामान्य नागरिकांचा लालपरी द्वारे सुखकर व सुरक्षित प्रवास होत असल्याने आधार माणुसकीचा उपक्रमाच्या वतीने बर्दापूर पाटीवर माजलगाव आगाराची बस (माजलगाव ते लातूर) या गाडीचे चालक सुदाम पवार यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आधार माणुसकीचा उपक्रमाचे प्रमुख ॲड संतोष पवार , ग्रामविकास अधिकारी बंडू जांभळे, बालासाहेब गंडले, मुरलीधर चिंचोळे, वसंतराव वांगे श्रीधर पांचाळ शेख कलीम बसचे वाहक गोपीचंद नीपटे उपस्थित होते.
