अंबाजोगाई

मी ही साहित्यिक असलंल्याने चेहरा पाहून माणसांच्या व्यथा वाचायला मला चांगल जमत -ना धनंजय मुंडे यांचे उदगार

सुदर्शन रापतवार यांनी पत्रकारितेची पत ठेवल्या मुळे आपल्या 3 पुस्तकातून विविध पैलूंवर प्रकाश टाकला

—डॉ वृषाली किन्हाळकर यांचे उदगार

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई ही सांकृति, साहित्य जोपासणारी नगरी असून या ठिकाणी माझी जडणघडण झाली म्हणून मी स्वतः ला भाग्यवान समजते. सुदर्शन रापतवार यांनी पत ठेवली आहे ती पत्रकारितेची व त्यामुळेच त्यांनी आपल्या तीन पुस्तकातून विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे असे उदगार
जेष्ठ साहित्यिक डॉ वृषाली किन्हाळकर यांनी काढले तर मी ही एक साहित्यिक असून चेहरा पाहून माणसाच्या व्यथा वाचायला मला चांगलं जमत असे उदगार ना धंनजय मुंडे यांनी काढले.
सजग पत्रकार सुदर्शन रापतवार यांच्या लेखणीतुन साकारलेल्या असामान्य, मंदिराचे गांव, सहज सुचलं म्हणून या साहित्याचा प्रकाशन सोहळा
डॉ वृषाली किन्हाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कृषी मंत्री मा ना धनंजय मुंडे खा. रजनी ताई पाटील, आ नमिताताई मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना वृषाली किन्हाळकर पुढे म्हणाल्या की, तीन बाळ जन्मायची असल्याने माझ्या सारख्या स्त्री रोग तज्ञाला कार्यक्रमाला बोलावला. आजही या गावात उत्तम माणुसकी आहे. रापतवाराने पत ठेवली आहे ती पत्रकारितेची. अंबाजोगाई चा सांस्कृतिक वारसा जोपासण्याचा रापतवाराचा सिहांचा वाटा असनार आहे. प्रत्येका जवळ एक गुण असतो. तो त्यांच्यात आहे. अंबाजोगाईचं वैभव लोहिया दाम्पत्य, अमर हबीब, दगडू लोमटे सारख्या व्यक्ती असून यांच्या सहवासामुळे स्वा रा ती वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण शिकल्या मुळे आम्ही भाग्यवान आहोत.
रापतवार यांची भाषा मवाळ आहे. असामान्य हे पुस्तक त्यांचं मेनुकार्ड आहे त्यांना ग्रंथ लिहायचा आहे. समाजाची नाडी तपासणारा डॉक्टर आहे. असामान्य पुस्तकात 27 व्यक्तिरेखा अधोरेखित केल्या आहेत.
मी शिकत असताना आद्यकवी मुकुंदराज समाधीकडून येणार वार माझ्या खिडकी मधून आत यायचं त्या मुळे मी कविता शिकले. आपल्या गावचे देणे काय आहे हे त्यांच्या कडून शिकावं. सहज सुचलं म्हणून या तीन शब्दातून रापतवार यांच्या साहित्याची ओळख देते.
या वेळी बोलताना ना धनंजय मुंडे म्हणाले की, आंबा नगरी साहित्याची नगरी आहे. ग्रंथ संपदा जोपासणारी नगरी आहे. मी ही साहित्य वेढा आहे, चेहरा पाहून व्यथा वाचायच मला समजतंय. अंबाजोगाई नगरीने अनेक जेष्ठ पत्रकार दिले आहेत. आज डिजिटल मिडीयाला बुड ना शेंडा आहे. अशाही परिस्थिती मध्ये रापतवार हे 3 पुस्तक प्रकाशित करत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे.
या वेळी खा रजनीताई पाटील म्हणाल्या की, मला पुण्याची उणीव अंबाजोगाई मध्ये वाटली नाही. मराठी भाषेला अभिजित भाशेचा दर्जा मिळावा या साठी माझे प्रयत्न आहेत.
असामान्य पुस्तकात तळा गाळातील व्यक्तिमत्वाला स्थान दिल्या गेलं आहे.
अंबाजोगाई मध्ये मला रत्ना सारखी माणस मिळाली. सर्वांच्या स्फूर्तीचे केंद्र अंबाजोगाई आहे.
या वेळी बोलताना आ नमिता ताई मुंदडा म्हणाल्या की, 40 वर्षात रापतवार यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. अंबाजोगाई मध्ये वेगळी ओळख निर्माण केलेल्या असंख्य व्यक्ती आहेत. अंबाजोगाईचा एतिहासिक वारसा जोपासन्याचा प्रयत्न मंदिराच गांव या माध्यमातून केला आहे.
या वेळी बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की, आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून रापतवार यानी केला असून नवीन पिढीला हे मार्गदर्शक ठरणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदर्शन रापतवार यांनी केले.
या प्रसंगी अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे, दत्ता आबा पाटील, अनिकेत लोहिया, डॉ वंगे, राजेसाहेब देशमुख, राजेश्वर चव्हाण, राजाभाऊ औताडे, हनुमंत मोरे, प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे, उद्धव बापू आपेगावकर, दिलीप सांगळे, एस बी सय्यद, अमर हबीब, दगडू लोमटे, ऍड अनंतराव जगतकर, मनोज लखेरा, गोविंद देशमुख, यांच्या सह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अभिजित जोंधळे तर आभार विजय रापतवार
यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी बळीराम उपाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संगीत रजनीच्या माध्यमातून सर्वांचे मनोरंजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!