अंबाजोगाई

जात, धर्म संपुष्टात आणण्यासाठी छ. शिवाजी महाराजासह फुले शाहू आंबेडकरांची लढाई होती मात्र आज जाती धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी समाजात विष पेरण्याचे काम सुरू

*जात, धर्म संपुष्टात आणण्यासाठी छ. शिवाजी महाराजासह फुले शाहू आंबेडकरांची लढाई होती मात्र आज जाती धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी
समाजात विष पेरण्याचे काम सुरू*

—प्रा कविता म्हेत्रे यांचे उदगार

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
जात धर्म संपुष्टात आणण्याची छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांची लढाई होती मात्र आज जाती धर्मात तेढ कसं निर्मान होईल, माणसात माणूस कसा राहणार नाही या साठी समाजात विष पेरण्याचे कांम सुरू आहे असे उदगार पुरोगामी विचार जागर अभियाना अंतर्गत ” *मी सावित्री जोतीराव फुले*” ह्या नाट्यप्रयोगाच्या सादरकर्त्या, प्रमुख मार्गदर्शक प्रा.कविता म्हेत्रे अंबाजोगाई वासीयांशी संवाद साधत असताना काढले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ऍड अनंतराव जगतकर यांची उपस्थिती होती तर या प्रसंगी जेष्ठ पत्रकार दत्तात्रय अंबेकर, साहित्यिक विद्याधर पांडे, विश्वांबर वराट, सुरेखा पवार, सौ सुमन घाडगे, चंद्रकांत वडमारे यांच्या सह संयोजक रावसाहेब घाडगे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना प्रा कविता म्हेत्रे म्हणाल्या की समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून आपला प्रयत्न सुरू असून आज महाराष्ट्रच नव्हे तर देशात बाईला पुरुषांची भीती वाटते आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महिलांचा सन्मान होत होता. आज राज्यात महिला, मुली सुरक्षितता नाही. 4 वर्षाच्या लेकरावर बलात्कार होत असेल तर याला शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणायचं का? असा सवालही या वेळी त्यांनी केला.
55 वर्षा पूर्वी शरद पवार साहेब आपल्याला एकचं मुलगी होऊ देतात हा फुले शाहू आंबेडकर यांचा विचार असून आज लोकशाहीची व्याख्या बदलली आहे. आज लोकशाही जिवंत नाही. काही लोकांनी काही लोकांसाठी चालवलेले राज्य ही लोकशाही बनली आहे आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीला सुरुंग लावण्याचे काम कोण करत असेल तर ती जनता आहे.
आरक्षणा साठी आपण भांडत सुटल्याने माणसात माणूस राहिलेला नाही. राजकीय पक्षाचे ध्येय सत्तेत जाणे असून सत्तेत येण्यासाठी डोके मोजली जातात तो व्यक्ती कसा आहे, त्याचे चारित्र्य कसे आहे हे पाहिलं जातं नाही.
जगात सर्वात सुंदर स्वातंत्र्य आसून त्यासाठी स्त्री ला धाडसी बनवल्या गेलं पाहिजे हे महात्मा फुले यांनी सांगितले आहे. मात्र आज सर्व महापुरुषाना जाती जाती मध्ये बांधून ठेवल्या जात आहे.
पहिली बेटी तूप रोटी, दुसरी बोटी कपाळावर अटी असं सर्वत्र म्हंटल्या जाते एकूणच मुलींना नाकारनारी येथील समाज व्यवस्था असून छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे स्वराज्य उभा केलं ते जिजाऊ माते मुळे त्या साठी मुलींना निर्भीड बनू द्या. तिला भरपूर शिक्षण शिकू द्या. लाडक्या बहिणी साठी 45 हजार कोटी खर्च केल्या जात असताना 1 हजार लेकरं शिक्षणा पासून वंचित आहेत ही खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.
महात्मा फुले यांनी समाजसेवे साठी आपल सर्वस्व अर्पण केल. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई करताना कधीही मुहूर्त पाहिला नाही. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकराचा राहिला आहे का? ज्या शाळा सुरू करण्यासाठी महात्मा फुले यांनी आयुष्य खर्च केलं त्या शाळा बंद करण्याचा घाट घातल्या जात आहे. शिक्षणाची वाट कोण बंद करत असेल तर ही राजकीय व्यवस्था. आदी जातीच्या नावावर शिक्षण नाकारलं जायचं आज पैशाच्या नावावर शिक्षण नाकारल्या जातंय.
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रशांत पवार तर आभार प्रदर्शन रावसाहेब घाडगे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!