अंबाजोगाई

अंबाजोगाई शहराचा सांस्कृतीक वारसा दिवसेंदिवस लोप पावत चालला परळी करांनी तो काबीज केला

भविष्यात तरी या सांस्कृतिक वारश्याला उभारी देण्याचे काम येथील राजकीय सामाजिक कार्यकर्त्यां कडून होणार का

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

एकेकाळचा लोप पावत चाललेला अंबाजोगाई शहराचा सांस्कृतीक वारसा मागील काही वर्षात परळी शहराने काबीज केला असून भविष्यात तरी गणेशोत्सवाच्या काळात या सांकृतिक वारस्याला उभारी देण्याचे काम येथील राजकीय सामाजिक कार्यकर्त्या कडुन

होईल का असा प्रश्न या निमित्ताने होतो आहे.

विविध दैवदेवतांनी पावन झालेली अंबाजोगाई ही एकेकाळची शैक्षणिक, सांस्कृतिक नगरी अनेक कलावंत या माती मधून नावा रुपाला आले. त्यांनी अंबाजोगाईचे नांव देश विदेशात नेऊन पोचवले, हा वारसा जतन करण्यासाठी सर्व शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना तशा प्रकारचे शिक्षण दिल्या जात असे, यातून विद्यार्थी स्वतः गायके, स्वतः वाद्य वाजवायचे, गणेशोत्सवाच्या काळात लहान मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा या साठी मेळे असायचे, सर्व गणेश मंडळा समोर त्यांचं सादरीकरण असायचं.

मात्र आज दिवसेंदिवस परिस्थिती बदलत चालली असुन या शहराचा ना शैक्षणिक वारसा शिल्लक राहिला आहे ना सांस्कृतिक वारसा. शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे उपजत कला गुण जोपासण्या साठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. शहर परिसराच्या मातीचा दोष म्हणा की काहीही म्हणा मात्र येथील महाविद्यालये गुंडाचे अड्डे बनू पहात आहेत. त्या मुळे येथील वातावरण दूषित होताना दिसत आहे.

आज गणेशोत्सव सुरू आहे, एकेकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असलेल्या या शहरात एकही सांस्कृतिक कार्यक्रम ना स्थानिक कलावंताचा आहे ना बाहेरील कलावांचा आहे. शहरातील गणेश मंडळात स्पर्धा लागली आहे ती फक्त गणेशमूर्ती कोण किती मोठी आणतो, गणेशा समोर कोण किती कर्कश्य आवाजाची डॉल्बी लावतो, कोणत्या गणेश मंडळाची किती केटी निघते याचीच.

आज शहरात बहुतांश ठिकाणी 20 फुटातून अधिक उंचीच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे, स्थापनेच्या दिवशी पोलिसांच्या नाकावर टिच्चून एल ई डी लाईटसह कर्कश्य आवाजाच्या डॉल्बीच्या आवाजाचा अनुभव अंबाजोगाई वासीयांनी घेतला.

स्थापनेच्या दिवशी पासून काही गणेश मंडळा कडुन केटी काढण्याचे नियोजन झाले व त्याला प्रारंभही झाला असून एकेकाळचा लोप पावत चाललेला अंबाजोगाई शहराचा सांस्कृतीक वारसा मागील काही वर्षात परळी शहराने काबीज केला आहे हे सिद्ध झाले आहे.

मागील अनेक वर्षे स्व. गोपीनाथराव मुंडे व त्या नंतर ना धनंजयजी मुंडे, आ पंकजाताई मुंडे हे परळीचे हे नेते राज्यातील सत्तास्थानात भूमिका निभावत असल्याने परळीचे नाव जसे राज्याच्या काना कोपऱ्यात पोचले आहे तसेच वाढत्या गुंडगिरी मध्ये ही परळीचे नांव कुठेही मागे राहिलेले नाही, या मुळे स्थानिकच्या व्यापाऱ्यांना, नागरिकांना काय झळा सोसाव्या लागतात हे सर्वसृत आहे. मात्र असे असले तरी परळीची एक बाजू जशी जगासमोर आली असली तरी दुसरी बाजूही जगा समोर यायलाच हवी.

मागील काही वर्षात ना धनंजयजी मुंडे, आ पंकजाताई मुंडे असतील यांच्या सहकार्याने, चंदूलालजी बियाणी यांच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्या मुळे नाथ प्रतिष्ठान असो की वैद्यनाथ प्रतिष्ठान असो परळी शहरात सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचे जे काम सुरू आहे त्याला तोड नाही. नवरात्रोत्सव व गणेशोत्सवाच्या काळात तर परळी कराना जी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळत आहे ती वाखागण्या जोगी आहे हे वास्तव नाकारून चालणार नाही.

अंबाजोगाईकर मात्र मागील अनेक वर्षा पासून गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमा पासून वंचित राहत असून सांस्कृतिक कार्यक्रम सोडा

दुर्देव हे आहे की बोटावर मोजण्या एवढे गणेश मंडळ सोडले तर कुठल्याही गणेश मंडळा समोर आपल्या गणेशाच्या समोर देखावे सादर करण्याचा, काही स्पर्धा घेण्याचा कुठलाही प्लॅन नाही. गणेश मंडळाना प्रोत्साहन मिळावे या साठी वसुंधरा प्रतिष्ठान व रोटरी क्लबच्या वतीने परितोषक ठेवल्या जातात मात्र शहरातील एकूण गणेश मंडळाचे देखावे पाहता कुठंतरी नाईलाजाने हे पारितोषिक देत आहोत की काय? अशी मानसिकता आयोजकांची होत असून भविष्यात तरी गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळाच्या उत्सहातून या सांकृतिक वारस्याला उभारी देण्याचे काम नंदकिशोर मुंदडा, राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे सह येथील राजकीय सामाजिक कार्यकर्त्या कडुन, रोटरी क्लब सारख्या संस्था कडुन

होईल का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आसून आणि हे प्रयत्न झाले तरच दिवसेंदिवस लोप पावत चाललेला अंबाजोगाई शहराचा सांस्कृतिक वारसा पूर्ववत होण्यास व निर्माण होत चाललेले दूषित वातावरण थांबवण्या साठी मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!