राज्यभरात गौरी लक्ष्मीच्या सणाची धामधूम सुरू असतानाच अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे शेतकऱ्याची आत्महत्या
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राज्यभरात गौरीलक्ष्मीच्या सणाची धामधूम सुरू असतानाच अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील शेतकरी मारुती पवार यांनी आज सकाळी आरक्षण व अतिवृष्टीच्या कारणाने झालेले पिकाचे नुकसान यामुळे वैफल्यग्रस्त होऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना आज सकाळी देवळा येथे घडल्याने गावात खळबळ उडाली आहे.
या विषयी प्राप्त माहिती अशी की संपूर्ण महाराष्ट्रासह अंबाजोगाई तालुक्यातील प्रत्येक घराघरात गौरी लक्ष्मीच्या सणाची धामधूम सुरू असताना तालुक्यातील देवळा येथील रहिवासी मारुती ज्ञानोबा पवार यांनी आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. त्याच्या खिशात एक पेनने लिहलेली चिठ्ठी मिळून आली असून आत्महत्ये पूर्वी लिहून ठेवलेल्या या चिट्ठीमध्ये लिहले आहे की, “मी मारुती ज्ञानोबा पवार आत्महत्या करत आहे. माझी शेती अति पावसामुळे नापीक झाली आहे. माझे 2 मुलं शिक्षण घेऊन बेरोजगार फिरत आहेत. तरी मायबाप सरकारने मराठा समाजाला आरक्षण त्या मुळे माझे लेकरं बेरोजगार आहेत. म्हणून हे टोकाचे पाऊल उचलले आहे.”
मृत्यू पश्चात मारुती पवार यास पत्नी 2 मुले, 1 विवाहित मुलगी असून या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांचे पथक दाखल झाले आसून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. मारुतीच्या खिशात सापडलेली चिठ्ठी त्याने स्वतःच लिहली आहे की नाही याची खातर जमा व पुढील तपास पोलीस करत आहेत.
