अंबाजोगाई येथील पत्रकार बांधव मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून होणारी रुग्ण सेवा गरजू लाभार्थ्यां पर्यंत पोचण्यास मदत करू शकतील* *मंगेशजी चिवटे यांची अपेक्षा*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)मुख्यमंत्री मा ना एकनाथराव शिंदे हे पत्रकार बांधवाशी खंबीर पणे उभा आसुन अंबाजोगाई ही संवेदनशील नगरी असल्याने येथील पत्रकार बांधव मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून होणारी रुग्ण सेवा चांगल्या पद्धतीने गरजू लाभार्थ्यां पर्यंत पोचण्यास मदत करू शकतील अशी अपेक्षा मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे यांनी व्यक्त केली.
मंगेशजी चिवटे हे अंबाजोगाई येथील पत्रकारा सोबत सुसंवाद साधत असताना बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख रामहारी राऊत, व्याख्याते किरण कोरे, स्वप्नील पाटील सह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना मंगेशजी चिवटे म्हणाले की, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून 20 प्रमुख गंभीर आजारावर उपचार होऊ शकतात. या मध्ये भाजलेल्या रुग्णावर उपचार होऊ शकतात, शेतात विजेचा झटका बसून जखमी झालेल्या शेतकऱ्यांवर उपचार,
अपघातात जखमी झालेल्या दुचाकी स्वारावर उपचार, मुदतपूर्व झालेल्या डिलिव्हरी मधील बालकावर उपचार, या साठी 1 लाखापर्यन्त मदत,
जन्मजात मूकबधिर असलेल्या बालकांसाठी 2 लक्ष रुपया पर्यन्त मदत केल्या जात असून आता पर्यन्त या माध्यमातून 40 हजार रुग्णाना लाभ झाला असुन यात 1 हजार बालकांचा समावेश आहे.
या योजने अंतर्गत हृदय रुगण शस्त्रक्रिया, मेंदू वरील शस्त्रक्रिया साठी मदत केल्या जाते. या वेळी त्यांनी मराठवडयात कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यात सर्वाधिक युवकांचे प्रमाण आहे आणि या रुग्णात बीड जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे.
निष्पन्न झालेल्या 40 हजार पैकी 3 हजार तोंडाचे कॅन्सरचे रुग्ण असून या सर्वांना गुटखा जन्य पदार्थ खाल्याने तोंडाचे कॅन्सर झालेले आहेत. यामध्ये केमो, कर्क रोग, डायलिसिस साठी वार्षिक 50 हजार मदत मिळू शकते. पायाची गुडघा वाटी बदलण्या साठी, 50 ते 1 लक्ष रुपयांची मदत मिळू शकते. तर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया साठी 2 लक्ष मदत मिळू शकते.
ही सर्व सेवा निशुल्क असून दलाला कडुन होणारी लूट थांबवून दलालावर चाप बसवल्या गेला असुम या पुढे कोणालाही रुपया खर्च होणार नाही. हा लाभ घेण्यासाठी पूर्वी 1 लाख 60 हजार रु उत्पन्न मर्यादा होती. आता ती 3 लाख 60 हजार पर्यंत करण्यात आली असून एवढ्या उत्पन्न गटातील सर्व रुग्ण या योजने साठी पात्र असणार आहे. आमच्या कार्यालयात प्रस्ताव आल्यावर एक आठवडयात ही मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केल्या जाईल असेही ते म्हणाले.
अंबाजोगाई शहरात ही ज्यांचे 30 बेडचे रुग्णालय आहे त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या मार्फत सेवा देण्यास परवानगी दिली जाईल.
चौकट:-
*नात्या मध्ये लग्न करणे टाळायला हवे*
या वेळी बोलताना मंगेश चिवटे यांनी नात्यात जे लग्न होतात त्या मधून जे आपत्य होते ते सदृढ नसते त्या मुळे आपसात लग्न टाळले पाहिजे असा सल्ला दिला.
