ईद-ए-मिलाद गणेश विसर्जना नंतर २२ सप्टेंबरला साजरा करण्याचा अंबाजोगाईच्या मुस्लीम बांधवांचा शांतता समितीच्या बैठकीत एकमुखी निर्णय
अंबाजोगाई [प्रतिनिधी ]
देशभरात 16 सप्टेंबर रोजी साजरा होणारा मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद हा पवित्र सण गणेश विसर्जना नंतर 22 सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा एकमुखी निर्णय अंबाजोगाई शहरातील मुस्लीम बांधवांच्या वतीने शहर पोलीस स्टेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांचे अभार मानले. बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधिक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलिस अधिकारी अनील चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोनी विनोद घोळवे यांच्या वतीने ईद-ए-मिलाद व गणेश उत्सवाच्या अनुषंगाने शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी व मुस्लीम बांधवांच्या उपस्थितीत शांतता कमिटी बैठकीचे अयोजन गुरुवारी सायंकाळी करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार देशपांडे, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता कानडे, शाखा अभियंता जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता गोविंद शेळके, पो उ नी निलंगेकर यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वर्षी गणेशाचे आगमन हे ७ सप्टेंबर रोजी तर विसर्जन मिरवणूक ही १७ सप्टेंबर रोजी आहे. तर मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलाद उत्सव हा १६ सप्टेंबर रोजी आहे. हिंदू मुस्लीम बांधवाचा सण व उत्सव एकाच वेळी आल्याने दोण्ही समाजाचे उत्सव शांततेत व गुण्यागोवींदाने कसे पार पाडतील या साठी नगरपालीकेच्या स्व. विलासराव देशमुख सभागृहात शुक्रवारी या शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गणेश मंडळाने देखावे, रक्तदान शिबरे,वृक्षारोपण व समाजपयोगी उपक्रम राबवावे,डीजेचा वापर न करता पारंपारीक वाद्याचा वापर करावा.मंडळाने वहातुकीची कोंडी होऊ नये आसे मंडप टाकावे.मिरवणूकीत असभ्य वर्तन न करता खेळीमेळीच्या वातावरणात मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे अवाहान पोनी विनोद घोळवे यांनी मंडळाच्या पदाधीकाऱ्यांना केले. रोटरी क्लबच्या वतीने गणेशोत्सव काळात राबवण्यात येणारे उपक्रम व स्पर्धा या विषयी धनराज सोळंके यांनी माहिती दिली. तर सामाजीक कार्यकर्ते सौफी मारूक बाबा, एड इस्माईल गवळी,एमआयएमचे रमीज सर यांनी महावितरने गांभीर्याने घेऊन उत्सवकाळात विद्यूत पुरवठा सुरळीत करण्याची तर गणेश विसर्जण होणाऱ्या रस्त्याची चाळणी झाली आहे त्याची डागडूगजी करण्याची मागणी प्रकाश बोरगावकर यांनी केली.पोलीस प्रशासणाने गांभीर्याने घेऊन विसर्जन मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मिरवणूक जाण्यास कोंडी होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची विनंती संतोष भालेकर, सतीश मोरे यांनी केली.गणेश विसर्जन मिरवणूक ही १७सप्टेंबर रोजी आहे.तर मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलाद उत्सव हा १६ सप्टेंबर रोजी आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी यासाठी शांतता कमेटीच्या या बैठकीत गणेश विसर्जना नंतर २२ सप्टेंबर रविवार रोजी ईद-ए-मिलाद उत्सव साजरा करण्याचा एकमुखी निर्णय मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.त्या निर्णयाचे स्वागत पोलीस प्रशासण व गणेश मंडळाच्या पदाधीकाऱ्यानी केले.शहरातील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच ईद-ए-मिलाद मिरवणुकीचे अध्यक्ष व पदाधिकारी, सदस्य, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस प्रशासणाचे अधीकारी, कर्मचारी उपस्थित होते.बैठकीचे प्रस्तावीक प्रकाश बोरगावकर यांनी तर अभार नायब तहसीलदार देशपांडे यांनी मानले.
